सामान्य काळातील एकविसावा सप्ताह
शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४
म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. " Watch therefore, for you know neither the day nor the hour.
ख्रिस्तसभा आज कार्मेलाईट संस्थेची मदर संत युफ्रेसीया ह्यांचा सण साजरा करीता आहे. केरळ मध्ये जन्मलेली मदर युफ्रेसीया ह्यांनी आपले सर्वस्व त्याग करून दयाकृत्ये करून व प्रार्थनामय जीवन सर्वांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांना प्रार्थना करणारी मदर म्हणून देखिल संबोधले जाई. विशेष म्हणजे त्यांनी पवित्र कुटुंबाच्या भक्तीला प्राधान्य दिले होते. मदर युफ्रेसीया ह्यांचे अनुसरण करीत आपण सुद्धा त्यागमय, व प्रार्थनामय जीवन जगत असतांना इतरांसाठी मध्यस्थी करावी.
आजच्या शुभवर्तमानातील दाखल्या मधल्या पाच कुमारीका शहाण्या होत्या. त्यांनी वराला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या ज्योती तेवत ठेवल्या होत्या. पवित्रतेचे तेल घालून त्या जागृत राहिल्या. मात्र पाच मुर्ख कुमारिका झोपी गेल्या. आपण आपल्या जीवनात जे जे अशुद्ध, | अपवित्र आणि देवासमोर जाण्यासाठी निषिद्ध आहे, त्याचा त्याग करण्याची गरज आहे. आपल्याला पवित्रतेचे जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आलेले असताना आपण कोणते जीवन जगतो ह्यावर आज चिंतन करु या.
✝️
पहिले वाचन : १करिथ १:१७-२५
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आम्ही क्रुसावर खिळलेल्या ख्रिस्ताचा गौरव करतो. हा यहुद्यांना अडखळण आणि हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या आम्हांला तो देवाचे ज्ञान असा आहे."
ख्रिस्ताने मला स्नानसंस्कार करण्यासाठी नव्हे तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यासाठी पाठवले नाही.
ज्याचा नाश होत आहे त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणाला तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण "मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन आणि बुद्धीमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.
ज्ञानी कोठे राहिले ? शास्त्री कोठे राहिले ? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही ? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता येत नाही, तेव्हा गौरविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात आणि हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर क्रुसावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुदयांना अडखळण आणि हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी आणि हेल्लेणी अशा दोघांनाही देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे. असा ख्रिस्ताचा गौरव गाजवतो, कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे..
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :1 Corinthians 1:17-25
Brethren: Christ did not send me to baptise but to preach the gospel, and not with words of eloquent wisdom, lest the cross of Christ be emptied of its power. For the word of the cross is folly to those who are perishing, but to us who are being saved it is the power of God. For it is written, "I will destroy the wisdom of the wise, and the discernment of the discerning I will thwart." Where is the one who is wise? Where is the scribe? Where is the debater of this age? Has not God made foolish the wisdom of the world? For since, in the wisdom of God, the world did not know God through wisdom, it pleased God through the folly of what we preach to save those who believe. For Jews demand signs and Greeks seek wisdom, but we preach Christ crucified, a stumbling block to Jews and folly to Gentiles, but to those who are called, both Jews and Greeks, Christ the power of God and the wisdom of God. For the foolishness of God is wiser than men, and the weakness of God is stronger than men.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३३:१- २,४-५,१०-११
प्रतिसाद : परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
१ )अहो, नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा;
सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.
वीवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा.
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.
२) कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे.
त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती
आणि न्याय ही प्रिय आहेत परमेश्वराच्या
वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
३) राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो,
लोकांचे संकल्प निष्फळ करतो,
परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते.
त्याच्या मनातील संकल्प पिढ्यान्पिढ्या कायम राहतात.
Psalm Psalm 33:1-2, 4-5, 10-11
The Lord's merciful love fills the earth.
Ring out your joy to the Lord, O you just;
for praise is fitting for the upright.
Give thanks to the Lord upon the harp;
with a ten-stringed lute sing him songs. R
For the word of the Lord is faithful,
and all his works to be trusted.
The Lord loves justice and right,
and his merciful love fills the earth. R
The Lord frustrates the designs of the nations;
he defeats the plans of the peoples.
The designs of the Lord stand forever,
the plans of his heart from age to age. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!
Acclamation:
Stay awake at all times, praying that you may have strength to stand before the Son of Man.
शुभवर्तमान मत्तय २५:१-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला."
येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितलाः “स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणांबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांना डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खानी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही दया, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हांला आणि तुम्हांला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतः करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नाला आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. नंतर त्या दुसऱ्यांही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांला नक्की सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. "
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 25:1-13
At that time: Jesus told his disciples this parable, "Then the kingdom of heaven will be like ten virgins who took their lamps and went to meet the bridegroom. Five of them were foolish, and five were wise. For when the foolish took their lamps, they took no oil with them, but the wise took flasks of oil with their lamps. As the bridegroom was delayed, they all became drowsy and slept. But at midnight there was a cry, 'Here is the bridegroom! Come out to meet him. Then all those virgins rose and trimmed their lamps. And the foolish said to the wise, 'Give us some of your oil, for our lamps are going out. But the wise answered, saying, 'since there will not be enough for us and for you, go rather to the dealers and buy for yourselves. And while they were going to buy, the bridegroom came, and those who were ready went in with him to the marriage feast, and the door was shut. Afterwards the other virgins came also, saying, 'Lord, lord, open to us. But he answered, 'Truly, I say to you, I do not know you.' Watch therefore, for you know neither the day nor the hour.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
वाट बघणे हे आपल्याला काही नवीन नाही. विद्यार्थी परिक्षेच्या निकालाची वाट बघतात. चाकरमाने किंवा नोकरी करणारे बस आणि ट्रेनची वाट बघतात. गरोदर बाई बाळाची वाट बघते. गृहिणी नळाच्या पाण्याची वाट बघते इत्यादी. वाट बघणे हा आपल्या जीवनाचा जणू अविभाज्य घटकच झाला आहे. वाट बघणे म्हणजेच जागृत राहणे. परमेश्वराचे भक्त प्रार्थना करतात. आपल्या मागण्या देवाला सांगतात. आपल्या मागण्या व प्रार्थना पूर्ण होण्याची वाट बघतात. त्याचप्रमाणे येशू म्हणतो, तुम्ही सुद्धा माझ्या परत येण्याची वाट बघा, तयार रहा, जागे व्हा, झोपू नका. प्रार्थना उपवास आणि दानधर्म ह्यांना भरपूर वेळ द्या. मूर्ख कुमारींसारखे म्हणजे झोपलेल्यांसारखे, तयारी नसलेल्यांसारखे वागू नका. तसे केल्यास तुम्ही स्वर्गाच्या राज्यापासून वंचित राहाल. आपला प्रभू कुठल्याही वेळी, कुठल्याही प्रहरी, कुठल्याही घटकेला येणार. त्याच्या स्वागतास आपण नेहमी जागृत आणि तयार राहायला हवे. आपल्या आध्यात्मिकतेला झोप येता कामा नये.
प्रार्थना : : हे प्रभू येशू, पवित्रतेने जीवन जगण्यास व तुला सामोरे जाण्यास धैर्य, कृपा व सामर्थ्य दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या