Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Thursday 29th August 2024 | 21st Week in Ordinary Time

सामान्य काळातील एकविसावा सप्ताह 

 गुरुवार २ ऑगस्ट २०२४ 

त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिलेHe went and beheaded him in the prison and brought his head on a platter and gave it to the girl,


संत योहान बाप्तिस्ताचा 
शिरच्छेद, 

रक्तसाक्षी

२४ जून रोजी ख्रिस्तसभा संत योहान बाप्तिस्तचा जन्मोत्सव साजरा करते. वयात आल्यानंतर योहान आपले मातापिता अलिशिवा व जखऱ्या ह्यांना सोडून अरण्यात राहू लागला. तो पश्चात्तापाची घोषणा करीत असे, 'पश्चात्ताप करा, देवाचे राज्य जवळ आले आहे. परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्या वाटा नीट करा.'आपल्या अनुयायांनी या जगातील आपली कार्यकर्तव्ये अगदी प्रामाणिकपणे पार पाडावीत आणि आपल्या पापांपासून शुद्ध होण्यासाठी यार्देन नदीत बाप्तिस्मा घ्यावा अशी त्याची शिकवण होती. योहानला बरेच शिष्य मिळालेले होते. ते प्रार्थना व उपवास करीत असत. त्यातील काही शिष्य पुढे येशूला येऊन मिळाले.'येशूची वृद्धी व्हावी व माझा हास व्हावा हे अगत्याचे आहे.' 'मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो परंतु तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्रीने परंतु योहान जितका नम्र होता तितकाच तो कणखर, सत्यनिष्ठ व गंभीर होता. हेरोदने आपला भाऊ फिलिप ह्याच्या बायकोशी अनधिकृतरित्या संबंध ठेवलेले त्याला मुळीच खपत नव्हते. त्यावर योहानने टीका केली. त्याने नागाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. लवकरच योहानला तुरुंगात बंदिस्त करण्यात आले.

पुढे राजाच्या वाढदिवसानिमित्ते त्याने मोठी मेजवानी दिली. त्यावेळी हेरोदियाच्या मुलीने नाच करून राजाला खूष केले. 'तुला हवे ते माग. अर्ध्या राज्यापर्यंत तू जे काही मागशील ते तुला मिळेल.' मुलीने आईच्या सांगण्यावरून राजाकडे योहान बाप्तिस्तचे शीर मागितले. राजा खिन्न झाला. परंतु बसलेल्या पाहुण्यांमुळे आणि दिलेल्या शपथेमुळे नाईलाजाने त्याने शिपायांना बोलावून योहानचे शीर मागितले. शिपायांनी मकारिअसच्या डोंगराळ भागातील तुरुंगात जाऊन योहान बाप्तिस्तचा शिरच्छेद केला व त्याचे शीर आणून ते राजाला दिले. राजाने ते मुलीला दिले. ही घटना ख्रिस्ताच्या दुःखसहनाच्या एक वर्ष आधी घडली.

योहान बाप्तिस्त हा जुन्या करारातील शेवटचा व नव्या करारातील पहिला संदेष्टा मानला जातो. तो जुन्या व नव्या कराराला जोडणारा दुवा आहे. तसेच जुन्या करारातील तो एकमेव संत होय.

चिंतन : हे प्रेमाचे जळते भट्टी! माझ्या प्रभो! तू साक्षात प्रेम आहेस! माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर - संत अगस्तीन


✝️             

हिले वाचन  यिर्मया १:१७-१९
वाचन :यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस."

परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे : “आपली कंबर कस, ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन.
पाहा, आज या सगळ्या देशांविरुध्द, यहुदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक आणि देशातील लोक यांच्याविरुध्द तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो. ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Jeremiah 1:17-19

In those days: The word of the Lord came to me, saying, "Dress yourself for work; arise, and say to them everything that I command you. Do not be dismayed by them, lest dismay you before them. And I, behold, make you this day a fortified city, an iron pillar, and bronze walls, against the whole land, against the kings of Judah, its officials, its priests, and the people of the land. They will fight against you, but they shall not prevail against you, for am with you, declares the Lord, to deliver you."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :   :१-६, १५.१७
प्रतिसाद :  माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, 
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. 
तू आपल्या न्यायनीतीने माझा उध्दार कर,
 माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.

२)  मला नेहमी थारा मिळावा म्हणून
 माझ्यासाठी निवासाचा खडक हो, 
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस
 कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस. 
हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.

३) कारण हे प्रभो परमेश्वरा,तूच माझे आशास्थान आहेस 
माझ्या तरुणपणापासून माझे श्रध्दास्थान आहेस. 
जन्मापासून तूच माझा आधार आहेस, 
मातेच्या उदरातून निघाल्यापासून
तूच माझा कल्याणकर्ता आहेस.

४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि
 तू सिध्द केलेल्या तारणदायी कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.
हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस 
आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.


Psalm 71:1-2, 3-4a, 5-6ab, 15ab and 17 

 My mouth will tell of your salvation, Lord.

n you, O Lord, I take refuge; 
let me never be put to shame. 
In your justice, rescue me, free me; 
incline your ear to me and save me. 

Be my rock, my constant refuge, 
a mighty stronghold to save me, 
for you are my rock, my stronghold. 
 My God, free me from 
the hand of the wicked. R

It is you, O Lord, who are my hope,
my trust, O Lord, from my youth.
On you I have leaned from my birth;
from my mother's womb,
you have been my help. 

 My mouth will tell of your justice,
and all the day long of your salvation. 
O God, you have taught me from my youth,
 and I proclaim your wonders still. R
 
जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.  
 आलेलुया!

Acclamation: 

Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven.

शुभवर्तमान   मार्क ६ : १७-२९
वाचक :   मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "माझी इच्छा अशी आहे की, स्नानसंस्कार करणाऱ्या योहानचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे. "

आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते आणि योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे सशास्त्र नाही." ह्याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना कारण योहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक संधीचा दिवस आला. तेव्हा हेरोदने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार आणि गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोदला आणि त्याच्याबरोबर भोजनाला बसलेल्यांना खूष केले.
तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन." तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?”ती म्हणाली, “स्नानसंस्कार करणाऱ्या योहानचे शीर.' तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, "माझी इच्छा अशी आहे की, स्नानसंस्कार करणाऱ्या योहानचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे. " तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शपथेमुळे आणि भोजनास बसलेल्या पाहुण्यांसमोर त्याला तिला नाही म्हणावेसे वाटेना. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Mark 6:17-29: 

At that time: Herod sent and seized John and bound him in prison for the sake of Herodias, his brother Philip's wife, because he had married her. For John had been saying to Herod, "It is not lawful for you to have your brother's wife." And Herodias had a grudge against him and wanted to put him to death. But she could not, for Herod feared John, knowing that he was a righteous and holy man, and he kept him safe. When he heard him, he was greatly perplexed, and yet he heard him gladly. But an opportunity came when Herod on his birthday gave a banquet for his nobles and military commanders and the leading men of Galilee. For when Herodias's daughter came in and danced, she pleased Herod and his guests. And the king said to the girl, "Ask me for whatever you wish, and will give it to you." And he vowed to her, "Whatever you ask me, will give you, up to half of my kingdom," And she went out and said to her mother, "For what should I ask?" And she said, "The head of John the Baptist." And she came in immediately with haste to the king and asked, saying, "I want you to give me at once the head of John the Baptist on a platter." And the king was exceedingly sorry, but because of his oaths and his guests he did not want to break his word to her. And immediately the king sent an executioner with orders to bring John's head. He went and beheaded him in the prison and brought his head on a platter and gave it to the girl, and the girl gave it to her mother. When his disciples heard of it, they came and took his body and laid it in a tomb.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: आज आपण संत योहान बाप्तिस्ताचे दुःखसहन याची स्मृती साजरी करीतो. लोकांना खऱ्या मसिहाची ओळख करण्यासाठी त्याने अरण्यात जाऊन प्रार्थना आणि उपवास केला. यार्देन नदीत येशूला स्नानसंस्कार दिला आणि आपली कनिष्ठता व्यक्त केली. योहान बाप्तिस्ता हा सरळ बोलणारा माणूस होता. जे चूक ते चूक आणि जे बरोबर ते बरोबर अशा वृत्तीचा होता. हेरोद आणि हेरोदीया ह्यांच्या व्यभिचारी वृत्तीला त्याने विरोध केला. त्यांना सांगितले की, हे वागणे चुकीचे आणि नियमबाह्य आहे, असे वागू नका. असे बऱ्याचदा योहानाने त्या दोघांना सांगितले. परंतु हेरोदीयाने कपट वृत्तीने योहानाचा शिरच्छेद करवून घेतला. आपले पाप लपवण्यासाठी तिने देवाच्या संदेष्ट्याचा वध केला. योहान बाप्तिस्ताचे दुःख आणि येशू ख्रिस्ताचे दुःख सारखेच आहे. ते चुलत भाऊ होते. मरीया आणि अलिशीबेच्या भेटीच्या वेळी योहानाने आईच्या उदरात उडी मारून येशूचे अस्तित्व आणि दैवी उपस्थिती दर्शवली. योहान साधे आणि पवित्र जीवन जगला. त्याने आपले संपूर्ण जीवन प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी समर्पित केले. तो एक महान संदेष्टा होता. येशूने योहानाची महानता वर्णीली आणि सांगितले की, स्त्रीपासून जन्मलेली त्याच्यापेक्षा मोठी व्यक्ती कोणी नाही. योहान एक पवित्र माणूस आहे हे हेरोदाला माहित होते तरी त्याने योहानाला तुरुंगात टाकले. येशू निर्दोष होता हे पिलाताला ठाऊक असतानाही त्याने येशूला मरणदंडाची शिक्षा सुनावली. हेरोदीयाच्या रागामुळे योहानाचा शिरच्छेद करण्यात आला. त्याचप्रमाणे शास्त्री आणि परूशी ह्यांचा क्रोध आणि मत्सर येशूच्या मृत्युस कारणीभूत ठरला. योहानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी त्याचे शरीर दफन केले. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या काही शिष्यांनी त्याचे शरीर थडग्यात ठेवले. योहान आणि येशूने आपले जीवन इतरांच्या सेवेस अर्पिले. आपण येशूची सेवा करण्यास तयार आहोत का ?
प्रार्थना हे प्रभू परमेश्वरा, सदाचरण, सत्य आचरण करुन तुझी सुवार्ता जगाला विण्यासाठी आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️