सामान्य काळातील एकविसावा सप्ताह
बुधवार २८ ऑगस्ट २०२४
अरे आंधळ्या परुशा, पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल."You blind Pharisee! First clean the inside of the cup and the plate, that the outside also may be clean."

हिप्पोचे संत अगस्तीन
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (३५४-४३०)
ख्रिस्तसभा आज महान धर्मपंडित संत आगस्टीनचा सन्मान करीत आहे. पाप कितीही मोठे असले तरी देवाची दया व कृपा त्यापेक्षा खूप महान आहे. पापी आगस्टीनचे परिवर्तन झाले आणि पश्चातापी अंत:करणाने देवाला शरण गेलेल्या आगस्टीनने आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताला वाहीले. संत आगस्टीन म्हणतात, आपली हृदये परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती त्या परमेश्वराठायी विसावा पावल्याशिवाय शांत होऊ शकत नाही."
बिशप अगस्तीन जगातील प्रकांडपंडितांपैकी ख्रिस्तसभेचे विख्यात विद्वान धर्मपंडित होते. त्यांनी तत्त्वज्ञान व ईशज्ञान या दोन्ही क्षेत्रांत आपला असा वेगळा ठसा उमटविलेला होता. 'कृपा' या विषयावरील त्यांचे विचार देवाचा सार्वभौम अधिकार आणि मानवाची स्वतंत्र इच्छाशक्ती या दोहोंचा सुंदर संगम घालताना दिसतात. आपल्या पश्चात्तापाची व परिवर्तनाची प्रक्रिया व श्रद्धेचा प्रवास त्यांनी 'आत्मनिवेदन' (Confessions) या जगप्रसिद्ध आत्मचरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. परमेश्वराचे निर्मितीकार्य वर्णन करणारे 'सिटी ऑफ गॉड' हे पुस्तक तर नाशवंत वस्तूंमध्ये देवाचे अविनाशी सामर्थ्य कसे भरून राहिलेले आहे त्याचे सुंदर वर्णन करणारे आहे.
संत अगस्तीन २८ ऑगस्ट ४३० साली मरण पावले. त्यांच्या शरीराचे अवशेष आठव्या शतकापासून 'पाविया' येथे ठेवण्यात आलेले आहेत.
चिंतन : हे प्रेमाचे जळते भट्टी! माझ्या प्रभो! तू साक्षात प्रेम आहेस! माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नी प्रज्वलित कर - संत अगस्तीन
पहिले वाचन : २ थेस्सलनीकरांस पत्र ३:६-१०.१६-१८
वाचन :पौलचे थेस्सलनिकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या आणि आम्हापासून प्राप्त झालल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणालाकाम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. ही प्रत्येक पत्रात खूण आहे, मी अशा रीतीने लिहीत असतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
First Reading :2 Thessalonians 3:6-10, 16-18
In the name of the Lord Jesus Christ, we urge you, brothers, to keep away from any of the brothers who lives an undisciplined life, not in accordance with the tradition you received from us. You know how you should take us as your model: we were not undisciplined when we were with you, nor did we ever accept food from anyone without paying for it; no, we worked with unsparing energy, night and day, so as not to be a burden on any of you. This was not because we had no right to be, but in order to make ourselves a model for you to imitate. We urged you when we were with you not to let anyone eat who refused to work. May the Lord of peace himself give you peace at all times and in every way. The Lord be with you all. This greeting is in my own hand-PAUL. It is the mark of genuineness in every letter; this is my own writing. May the grace of our Lord Jesus Christ be with you all.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र १२८:१-२,४-५
प्रतिसाद : जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य !
१ जे परमेश्वराचे भय धरतात जे त्याच्याच मार्गानी चालतात ते धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
२ पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना असा आशीर्वाद मिळेल.
तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो.
Psalm 128:1-2, 4-5
Blessed are all who fear the Lord.
1 Blessed are all who fear the LORD, who walk in obedience to him.
2 You will eat the fruit of your labor; blessings and prosperity will be yours.
3 Your wife will be like a fruitful vine within your house; your children will be like olive shoots around your table.
4 Yes, this will be the blessing for the man who fears the LORD.
5 May the LORD bless you from Zion; may you see the prosperity of Jerusalem all the days of your life.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुहे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
Acclamation:
The word of God is living and active, discerning the thoughts and intentions of the heart.
शुभवर्तमान मत्तय २३:२७-३२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा."
येशू म्हणाला, "अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा, त्या बाहेरून खरोखरच सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहा."
"अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्यांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो, तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहा, अशी स्वतः विरुद्ध साक्ष देता, तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 23:27-32
Jesus said, 'Alas for you, scribes and Pharisees, you hypocrites! You are like whitewashed tombs that look handsome on the outside, but inside are full of the bones of the dead and every kind of corruption. In just the same way, from the outside you look upright, but inside you are full of hypocrisy and lawlessness. Alas for you, scribes and Pharisees, you hypocrites! You build the sepulchers of the prophets and decorate the tombs of the upright, saying, "We would never have joined in shedding the blood of the prophets, had we lived in our ancestors' day." So! Your owrr evidence tells against you! You are the children of those who murdered the prophets! Very well then, finish off the work that your ancestors began.'
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
तुमच्या प्रत्येक कृतीत आणि विश्वासात स्थिर रहा असे संत पॉल आपल्याला पहिल्या वाचनात सांगत आहे. कुठल्याही आमिषाला बळू पडू नका की ज्याने तुमचा विश्वास कमी होईल. प्रभू ख्रिस्ताविषयी तुम्ही जे काही ऐकले आहे किंवा शिकवले आहे ते बळकट धरून रहा. किंबहुना तुम्ही ख्रिस्ताचाच हात धरून राहा. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू परत एकदा शास्त्री आणि परुशी यांना ढोंगी, लबाड म्हणतो. कारण त्यांनी खरा धर्म, परमेश्वराची खरी शिकवण लोकांना न देता त्यांचेच नियम लोकांवर लादले होते. न्याय, दया आणि विश्वास हे गुण परमेश्वराचे आहेत. तेच गुण ख्रिस्ताठायी आहेत आणि हेच गुण असलेली माणसे परमेश्वराला संतुष्ट करतात.परंतु या गुणांविषयी शास्त्री आणि परूशांनी लोकांना अंधारात ठेवले म्हणून येशूला राग आला. न्याय, दया आणि विश्वास हे गुण आपला अंतरात्मा स्वच्छ करतात. आज आपण संत मॉनिकाची स्मृती साजरी करतो. आपला मुलगा अगस्तीन वाईट विचार, वाईट संगत आणि वाईट कृत्यांपासून दूर राहावा म्हणून तिने तब्बल १७ वर्षे प्रार्थना केली तेव्हा कुठे अगस्तीनचे परिवर्तन झाले आणि त्याने जो ख्रिस्ताचा हात पकडला तो कधीच सोडला नाही.
प्रार्थना : हे दयावंत परमेश्वरा, आमच्या अंत:करणात दयाभाव वाढीस लाव, गरजवंतावर दया व प्रेम करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या