Marathi Bible Reading |Monday 23rd December 2024 | 4th Week of Advent

आगमनकाळातील ४चौथासप्ताह 

सोमवार २३ डिसेंबर २०२४

त्याने पाटी मागवून, “ह्याचे नाव योहान आहे” असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.And he asked for a writing tablet and wrote, "His name is John." 

  ✝️ 

कॅन्टीचे संत जॉन 
वर्तनसाक्षी (१३९०-१४७३)

सत्याच्या विरूद्ध असलेल्या सर्व मतांशी लढा द्या परंतु ह्या लढाईत सहनशीलता, कनवाळूपणा आणि परोपकार प्रेम ही शस्त्रे हाती बाळगा. कारण हिंसा ही दुधारी तरवारीप्रमाणे तुमच्या आत्म्याला इजा करते, आणि तुमचा शुद्ध हेतू देखील पायदळी तुडविते. - कॅन्टीचे संत जॉन


✝️
 
प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा आणि मशिहा आहे अशी साक्ष योहानाने दिली. प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याचे स्वागत हेच त्याच्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट होते. धैर्यवान आणि सत्यवादी असलेल्या योहानाचा अन्यायी हेरोदाने शीर धडावेगळे करुन त्याचा वध केला. परंतु स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाची प्रशंसा केली आहे.त्याच्या मृत्यूनंतरही त्याचे शिष्य त्याच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहिले आणि म्हणूनच नंतर ते ख्रिस्ताचे अनुयायी बनले. योहान बाप्तिस्ताचा जन्म केवळ ख्रिस्त जन्मासाठी होता आणि म्हणूनच 'प्रभू त्याच्या बरोबर होता."
आपणा प्रत्येकाला ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्याची संधी देवाने दिलेली आहे त्या संधीचा योग्य तो फायदा घेऊ या.

पहिले वाचन मलाखी  ३:१-४, ४:५-६
वाचक : मलाखी या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “पाहा परमेश्वराचा दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुम्हांकडे पाठवीन."

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो, ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पाहा, करार घेऊन येणाऱ्या संदेष्ट्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल ? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल ?"
"कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परिटाच्या खारासारखा आहे. रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजाला शुद्ध करील, त्याला सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा आणि येरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.”
पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुम्हांकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीला शापाने ताडन करावे असे न होवो.”
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading Malachi 3:1-4; 4:5-6

Thus says the Lord God: "Behold, I send my messenger, and he will prepare the way before me. And the Lord whom you seek will suddenly come to his temple, and the messenger of the covenant in whom you delight, behold, he is coming, says the Lord of hosts. But who can endure the day of his coming, and who can stand when he appears? For he is like a refiner's fire and like fullers' soap. He will sit as a refiner and purifier of silver, and he will purify the sons of Levi and refine them like gold and silver, and they will bring offerings in righteousness to the Lord. Then the offering of Judah and Jerusalem will be pleasing to the Lord as in the days of old and as in former years. "Behold, I will send you Elijah the prophet before the great and awesome day of the Lord comes. And he will turn the hearts of fathers to their children and the hearts of children to their fathers, lest I come and strike the land with a decree of utter destruction."
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र २५:४-५,८-१०,१४
प्रतिसाद :   तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.

१) हे प्रभो, तुझे मार्ग मला दाखव, 
तुझ्या वाटा मला प्रकट कर. 
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव, 
मला वळण लाव, कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.

२) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे! 
तो पापीजनांना सन्मार्गाने चालायला शिकवतो. 
नम्र लोकांना न्यायपरायणता दाखवतो. 
गरिबांना आपला मार्ग प्रकट करतो.

३) परमेश्वराच्या कराराचे आणि त्याच्या
 आज्ञांचे पालन करणाऱ्यांना प्रभूचे सर्व
 मार्ग प्रेमपूर्ण आणि विश्वसनीय आहेत. 
त्याचे भय धरणाऱ्यांशी प्रभूचे सख्य असते. 
तो आपला करार त्यांना प्रकट करतो.

Psalm  
Psalm 25:4-5ab, 8-9, 10 & 14

Look up and raise your heads, because your redemption is drawing near.
O Lord, make me know your ways.
Teach me your paths.
Guide me in your truth, and teach me; 
for you are the God of my salvation,

Good and upright is the Lord;
 he shows the way to sinners.
He guides the humble in right judgment; 
to the humble he teaches his way. 

 All the Lord's paths are mercy and faithfulness, 
for those who keep his covenant and commands.
 The Lord's secret is for those who fear him;
 to them he reveals his covenant.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
 इम्मानुएल, आमच्या राजा आणि न्यायाधीशा, हे प्रभो परमेश्वरा, ये आणि आमचे तारण कर.
आलेलुया!

Acclamation: 
O King of all nations and keystone of the Church: come and save man, whom you formed from the dust!

शुभवर्तमान लूक १:५७-६६
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
    "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचा जन्म."

अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी ते बाळकाची सुंता करायला आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको; ह्याचे नाव योहान ठेवावयाचे आहे.' ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून, “ह्याचे नाव योहान आहे” असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरुन त्यांच्याभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बाळक होणार तरी कोण ?" कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 1:57-66
The time came for Elizabeth to give birth, and she bore a son. And her neighbours and relatives heard that the Lord had shown great mercy to her, and they rejoiced with her. And on the eighth day they came to circumcise the child. And they would have called him Zechariah after his father, but his mother answered, "No; he shall be called John." And they said to her, "None of your relatives is called by this name." And they made signs to his father, inquiring what he wanted him to be called. And he asked for a writing tablet and wrote, "His name is John." And they all wondered. And immediately his mouth was opened and his tongue loosed, and he spoke, blessing God. And fear came on all their neighbours. And all these things were talked about through all the hill country of Judea, and all who heard them laid them up in their hearts, saying, "What then will this child be?" For the hand of the Lord was with him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी एका संदेष्टट्याला पाठवले जात आहे. ही भविष्यवाणी बाप्तिस्मा करणारा योहाना व्यतिरिक्त इतर कोणाबद्दल नाही. पूर्वीच्या काळी रस्ते अवघड आणि खडतर होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणी भेट देणारा राजा रस्ता गुळगुळीत करण्यासाठी खडक आणि इतर अडथळे दूर करण्यासाटी लोकांना पुढे पाठवत असे. त्याचप्रमाणे बाप्तिस्मा करणारा योहानाला येशूचे स्वागत करण्यासाठी, लोकांची अंतःकरणे तयार करण्यासाठी, त्यांना त्यांच्या पापी मार्गाबद्दल पश्चात्ताप करण्यास पाठवले आहे. परमेश्वराच्या क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकत नाही. पण देव आपला नाश करायला येत नाही. उलट आपल्यापैकी प्रत्येकाने त्याला नापसंत असलेल्या सर्व गोष्टींपासून दूर जावे अशी त्याची इच्छा आहे. तो आपल्याला शुद्ध करून पवित्र करू इच्छितो. येशूला आपल्या अंतःकरणात राहायचे आहे. जर आपण जिद्दीने पाप करत राहिलो तर आपल्याला परमेश्वराच्या न्यायाला सामोरे जावे लागेल. परंतु, जर आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला तर आपण त्याच्या आगमनाने आनंदित होऊ.
प्रार्थना :- हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या जीवनातील ध्येय परिपूर्णतेस नेण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, आमेन.

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या