आगमनकाळातील ४चौथासप्ताह
मंगळवार २४ डिसेंबर २०२४
इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो. कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे Blessed be the Lord God of Israel; because he hath visited and wrought the redemption of his people:
संत बर्नर्ड तर भावनातिशयाने म्हणतात की, “प्रेमास पात्र, कौतुकास योग्य आणि आदरणीय असे काही जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपण बेथलेहेमास जाऊ या !"
१८ डिसेंबर १९३३ साली बोलीयम येथील ओंकेझेंल ह्या ठिकाणी बेर्टिझोनिया होल्टकॅम्प ह्या भाविकाला दिलेल्या दर्शनात पवित्र मरियेने पुढील शब्द उच्चारले, "ख्रिस्तजन्माचा खरा आनंद साजरा करण्यासाठी प्रार्थना, उपवास, प्रायश्चित्त आणि त्याग इ. द्वारे आपली आध्यात्मिक तयारी करण्याचे आवाहन लोकांना करा.”
✝️
प्रतिसाद : प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२)“मी स्वत: निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे. तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन."
३) तो मला म्हणेल, "तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस." त्याच्यावरचे माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.
योहनचा बाप जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन भाकीत केले ते असे :इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो. कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्यांच्या घराण्यात तारणाचे शिंग उभारले आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते. म्हणजे आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार, म्हणजे जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. ती अशी, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.आणि हे बाळका, तुला परमेश्वराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्यासाठी तू त्याच्यापुढे चालशील, ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्याच्या पापांच्या क्षमेने तारणाचे ज्ञान द्यावे. आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्यायोगे उदयप्रकाशावरून आमच्याकडे येईल. ह्यासाठी की, त्याने अंधारात आणि मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे.”
✝️
0 टिप्पण्या