आगमनकाळातील तिसरा सप्ताह
शनिवार २१ डिसेंबर २०२४
✝️
“स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य!
"Blessed are you among women, and blessed is the fruit of your womb!
✝️
आपल्या सर्वांची माता असलेली पवित्र मरिया ख्रिस्ती श्रद्धेचा आणि ख्रिस्ती सेवेचा महान आदर्श आहे. मरियेने आपले सर्वस्व देवाठायी समर्पित केले होते म्हणूनच, 'प्रभू तिच्याठायी होता, तिच्या बरोबर होता, असे शुभवर्तमान सांगते.' ख्रिस्त जन्मापासून कालवरीवरच्या क्रुसावरील बलीदानापर्यंतचा मरियेचा प्रवास तिच्या समर्पित जीवनाची साक्ष देतो.
पवित्र मरिया मातेसारखे प्रार्थनामय, श्रद्धापूर्ण आणि आणि सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाला तिच्या गुणांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच मरिया भक्तीद्वारे आपण प्रभू येशूच्या रहस्यमय जीवनात सहभागी होऊ या.
पहिले वाचन गीतरत्न २:८-१४
वाचक : गीतरत्न या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, माझा वल्लभ; डोंगरावरून उड्या टाकीत येत आहे."
हा माझा वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या टाकीत, टेकड्यावरून दौडत येत आहे ! माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे. पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे. तो खिडकीतून डोकावत आहे. तो झरोक्यातून पाहत आहे.
माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल. पाहा, हिवाळा गेला आहे. पाऊस संपून गेला आहे. पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत. पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे.
आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत. द्राक्षवेलीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे. माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशाला राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे. तुझे मुख रम्य आहे.”
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Song of Solomon 2:8-14
The voice of my beloved! Behold, he comes, leaping over the mountains,bounding over the hills. My beloved is like a gazelle or a young stag Behold, there he stands behind our wall, gazing through the windows, looking through the lattice. My beloved speaks and says to me: "Arise, my love, my beautiful one, and come away, for behold, the winter is past; the rain is over and gone. The flowers appear on the earth, the time of singing has come, and the voice of the turtle-dove is heard in our land. The fig tree ripens its figs, and the vines are in blossom; they give forth fragrance. Arise, my love, my beautiful one, and come away. O my dove, in the clefts of the rock, in the crannies of the cliff, let me see your face, let me hear your voice, for your voice is sweet, and your face is lovely.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :३३:२-३,११-१२,२०-२१
प्रतिसाद : प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा.
१) वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा.
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.
त्याच्याकरिता एखादे नवे गीत गा.
वीणेवर आपली कला पणाला लावा.
आनंदाने गजर करा.
२) प्रभूची योजना सदैव टिकते
त्याच्या मनातले विचार पिढ्यान्पिढ्या अढळ असतात.
प्रभू ज्या राष्ट्राचा देव, तेच सुखी.
प्रभूने त्यांना लोक म्हणून निवडलेले आहे.
३)आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे.
तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल.
आमच्या मनाला होणाऱ्या आनंदाचा उगम
त्याच्याच ठायी आहे.
त्याच्या पवित्र नामावर आमचा भरवसा आहे.
Psalm Psalm 33:2-3, 11-12, 20-21
Ring out your joy to the Lord, O you just; O sing him a song that is new.
Give thanks to the Lord upon the harp;
with a ten-stringed lute sing him songs.
O sing him a song that is new;
play skilfully, with shouts of joy.
The designs of the Lord stand forever,
the plans of his heart from age to age.
Blessed the nation whose God is the Lord,
the people he has chosen as his heritage.
Our soul is waiting for the Lord.
He is our help and our shield.
In him do our hearts find joy.
We trust in his holy name. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
सकाळच्या नक्षत्रा, चीरप्रकाशाच्या तेजा, नीतिसूर्या, ये आणि अंधारात राहाणाऱ्यांना आणि मृत्यूच्या छायेत असलेल्यांना प्रकाशित कर.
आलेलुया!
Acclamation:
O Emmanuel, our King, and Giver of Law: come to save us, Lord our God!