आगमनकाळातील तिसरा सप्ताह
शुक्रवार २० डिसेंबर २०२४
✝️
“मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे.
"Do not be afraid, Mary, for you have found favour with God.
✝️
संत डॉमणिक सिलोस
वर्तनसाक्षी (१०००-१०७३)
संत डॉमणिक हा तुरुंगातील कैद्यांचाही आश्रयदाता संत आहे.
✝️
स्पेनमध्ये होऊन गेलेल्या मोठमोठ्या संतगणांमध्ये सिलोसच्या ह्या डॉमणिकना खूप मानाचे स्थान देण्यात आलेले आहे. तो गर्भवती स्त्रियांचा आश्रयदाता संत मानला जातो. एकदा ११७७ साली जेनः डी गुझमन नावाच्या स्त्रीने त्याच्या थडग्यावर केलेल्या प्रार्थनेमुळे सुखरूप प्रसूती झाली आणि तिनेएका गोंडस बाळाला जन्म दिला. संत डॉमणिकच्या मध्यस्थीने हे बाळ सुखरूपपणे जन्माला आले म्हणून जेनने त्याचे नाव डॉमणिक असेच ठेवले. पुढे हाच डॉमणिक जगभरच्या 'ऑर्डर ऑफ प्रिचर्स' ह्या सुप्रसिद्ध प्रवचनकारांच्या संस्थेचा म्हणजेच डॉमणिकन संस्थेचा संस्थापक म्हणून जगासमोर आला. त्याची आई जेन डी गुझमन हिलाही धन्यवादित ही पदवी देऊन आल्ताराचा मान देण्यात आला. (अधिक माहितीसाठी वाचा संत डॉमणिक गुझमन : (ओ. पी. सण ८ ऑगस्ट).
सिलोसचा मठाधिपती गरोदर असलेल्या स्पेनच्या राणीजवळ संत डॉमणिकचा राजदंड आणून ठेवीत असे आणि राणीची प्रसूती सुरक्षितपणे पार पडावी म्हणून प्रसूतीच्या क्षणापर्यंत हा राजदंड तिथेच ठेवण्यात येई. अगदी अलिकडच्या काळापर्यंत स्पेनमध्ये अशी प्रथा होती.
संत डॉमणिक हा तुरुंगातील कैद्यांचाही आश्रयदाता संत आहे.
जखऱ्या व आलीशिबा ह्या वयातीत जोडप्याला देवाने महान आशीर्वाद दिला व तारण योजनेचा भक्कम पाया रचला. जखऱ्या, एक भक्तीमान, श्रद्धावान आणि देवाची सेवा करणारा दास होता, देवाचा आशीर्वाद आणि देवाचे वचन कधीच विफल होत नाही. म्हातारपणी अलीशिबेला दिवस गेले आणि योहान बाप्तिस्ता जन्माला आला वावरील अतूट श्रद्धा आणि देवाच्या आज्ञांचे पालन ह्यामुळे देवाचे वचन आपल्या जीवनात पूर्णत्वास येते. आपल्या सर्वांच्या जीवनात देवाचे वचन सक्रीय व फलदायी बनावे म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन यशया ७:१०-१४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर आहाजला आणखी म्हणाला, “तुझा देव परमेश्वर याच्याजवळ तू आपणासाठी चिन्ह माग, ते अधोलोकात असो किंवा ऊर्ध्व लोकात असो." आहाज म्हणाला, "मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पहाणार नाही." तेव्हा तो म्हणाला, “हे दावीदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐका : तुम्ही मनुष्यांना कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हांला चिन्ह देत आहे. पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासह देव) असे ठेवील."प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 7:10-14
In those days: The Lord spoke to Ahaz: "Ask a sign of the Lord your God, let it be deep as Sheol or high as heaven." But Ahaz said, "I will not ask, and I will not put the Lord to the test." And he said, "Hear then, O house of David! Is it too little for you to weary men, that you weary my God also? Therefore the Lord himself will give you a sign, Behold, the virgin shall conceive and bear a son, and shall call his name Immanuel.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :२४:१-६
प्रतिसाद : प्रभूचे स्वागत असो.
१) ही धरती प्रभूची, इथले सारे काही त्याचेच,
हे जग आणि इथे राहाणारे सारेदेखील त्याचेच आहेत.
त्यानेच तर सागरांवर तिचा पाया घातला
भूमिगत जलाशयांवर तिची स्थापना केली.
२) प्रभूच्या पर्वतावर कोण चढेल,
त्याच्या पवित्र क्षेत्रात कोण उभा राहील?
ज्याचे हात निष्कलंक आणि अंतःकरण शुद्ध आहे,
ज्याचे मन असत्याच्या मागे धावत नाही तोच!
३) त्याला प्रभूकडून आशीर्वाद प्राप्त होईल,
उद्धारकर्त्या देवाकडून न्याय मिळेल
असेच लोक त्याला शरण येतात.
याकोबच्या देवाचे दर्शन घेऊ. इच्छिणारे ते हेच.
Psalm 24:1-2, 3-4ab, 5-6
Let the Lord enter; he is the king of glory.
The Lord's is the earth and its fullness,
the world, and those who dwell in it.
It is he who set it on the seas;
on the rivers he made it firm. R
Who shall climb the mountain of the Lord?
Who shall stand in his holy place?
The clean of hands and pure of heart,
whose soul is not set on vain things.
Blessings from the Lord shall he receive,
and right reward from the God who saves him.
Such are the people who seek him,
who seek the face of the God of Jacob. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
सार्वकालिक स्वर्गराज्याचे दरवाजे उघडणाऱ्या
हे दावीदच्या किल्ले, अंधारमय बंदिवासात असलेल्या बंदिवानांची सुटका करण्यास ये.
आलेलुया!
Acclamation:
O Key of David, opening the gates of God's eternal Kingdom: come and free the prisoners of darkness!
शुभवर्तमान लूक१:२६-३८
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल.'
अलिशबेच्या गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणला, "हे कृपा पावलेल्या स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो." ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही."मरियेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही." देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलिशबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि ज्याला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही." तेव्हा मरिया म्हणाली, "पहा, मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.