आगमनकाळातील तिसरा सप्ताह
गुरुवार १९ डिसेंबर २०२४
✝️
"जखऱ्या , भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे.
"Do not be afraid, Zechariah, for your prayer has been heard,
✝️
रक्तसाक्षी (---२५०)
डेसियस सम्राटाच्या छळाच्या काळात नेमेसिअन हा इजिप्तचा मनुष्य चोरीच्या प्रकरणात आलेक्झांड्रिया येथे पकडण्यात आलेला होता. मात्र ख्रिस्ताच्या ह्या सेवकाने आपण ह्या गावचे नाहीत असे पुराव्यानिशी सिद्ध केले. परंतु ताबडतोब तो ख्रिस्ती असल्याच्या कारणावरून पकडला गेला. यावेळी मात्र त्याने निर्भयपणे आपण खरोखर ख्रिस्ती आहोत हे मान्य केले. त्याने ख्रिस्तावरील विश्वास पुन्हापुन्हा मोठ्या धैर्याने आणि निर्भिडपणे प्रकट केला. सम्राटाच्या धमक्यांना त्याने भीक घातली नाही. चोरापेक्षाही त्याला कठोर अशी शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला खांबाला बांधून काटेरी चापकांचे सपकारे त्याच्या पाठीवरूनं ओढण्यात आले. शेवटी चोरांबरोबरच आणि इतर गुन्हेगारांबरोबर त्याला अग्नीच्या भक्ष्यस्थानी टाकून जाळण्याचा आदेश देण्यात आला.
त्याचवेळी प्रमुखाच्या न्यायालयामध्ये चार सैनिक आणि आणखी एक ख्रिस्ती व्यक्ती ह्या वर्तनसाक्षी व्यक्तीला प्रोत्साहन देत उभ्या होत्या त्यांना न्यायाधीशासमोर उभे करण्यात आले आणि त्यांना शिरच्छेदाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु ज्या प्रसन्नतेने आणि हसतमुखाने हे सर्व ख्रिस्ती लोक मरणदंडाला तयार झाले ते पाहून प्रमुख मारेकरीसुद्धा आश्चर्यचकित झाला.
हेरॉन, आतेर, इजिदोर हे सर्व इजिप्शिअन लोक डायस्कोरस ह्या अवघ्या १५ वर्षीय युवकांसह आलेक्झांड्रियाच्या ह्या होमकुंडात स्वतःचा जीवनयज्ञ अर्पिण्यास उत्सुक झालेले होते. प्रथम त्यांची कातडी सोलण्यात आली. नंतर त्यांचे सांधे मोडण्यात आले. नंतर थोडाफार जीव असलेल्या त्या सर्वांना भगभगत्या अग्नीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आले. मात्र हे सर्व होत असताना प्रमुखाच्याही काळजाला थोडासा का होईना पाझर फुटला. त्याने कोवळ्या वयाच्या डायस्कोरस ह्या १५ वर्षीय बालकाला सोडून दिले.
जखऱ्या व आलीशिबा ह्या वयातीत जोडप्याला देवाने महान आशीर्वाद दिला व तारण योजनेचा भक्कम पाया रचला. जखऱ्या, एक भक्तीमान, श्रद्धावान आणि देवाची सेवा करणारा दास होता, देवाचा आशीर्वाद आणि देवाचे वचन कधीच विफल होत नाही. म्हातारपणी अलीशिबेला दिवस गेले आणि योहान बाप्तिस्ता जन्माला आला वावरील अतूट श्रद्धा आणि देवाच्या आज्ञांचे पालन ह्यामुळे देवाचे वचन आपल्या जीवनात पूर्णत्वास येते. आपल्या सर्वांच्या जीवनात देवाचे वचन सक्रीय व फलदायी बनावे म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन शास्ते १३:२-७,२४-२५
वाचक : शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन
सरा गावी दानवंशातला मनोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांझ असून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, “पाहा, तू वांझ असून तुला मुलबाळ झाले नाही. पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नको, कारण जन्मापासून तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्राएलाला पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.” त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, "एक देवमाणूस माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अतिगौरवशाली होते. पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही आणि त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, “पाहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, ह्यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपरयंत देवाचा नाजीर राहील." पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला. आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा आणि अष्टावोल ह्याच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Judges 13:2-7, 24-25a
In those days: There was a certain man of Zorah, of the tribe of the
Danites, whose name was Manoah. And his wife was barren and had no children. And the angel of the Lord appeared to the woman and said to her, "Behold, you are barren and have not borne children, but you shall conceive and bear a son. Therefore be careful and drink no wine or strong drink, and eat nothing unclean, for behold, you shall conceive and bear a son. No razor shall come upon his head, for the child shall be a Nazirite to God from the womb, and he shall begin to save Israel from the hand of the Philistines." Then the woman came and told her husband, "A man of God came to me, and his appearance was like the appearance of the angel of God, very awesome. I did not ask him where he was from, and he did not tell me his name, but he said to me, Behold, you shall conceive and bear a son. So then drink no wine or strong drink, and eat nothing unclean, for the child shall be a Nazirite to God from the womb to the day of his death." And the woman bore a son and called his name Samson. And the young man grew, and the Lord blessed him. And the Spirit of the Lord began to stir him.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :७१:३:६,१६-१७
प्रतिसाद : प्रभु, तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते.
१) माझा आधारस्तंभ हो.
तिथेच मला सदैव थारा मिळेल.
तूच माझ्याभोवती संरक्षक तट आहेस.
निर्दयी लोकांच्या तावडीतून माझी सुटका कर.
२)हे माझ्या प्रभू, तू माझी आशा आहेस.
हे प्रभुराया, बाळपणापासून तुझ्यावरच माझा भरवसा आहे.
जन्मापासूनच तुझ्यावर माझा हवाला आहे.
मातेच्या उदरातून आल्यापासून माझा संरक्षणकर्ता तूच आहेस.
३) हे प्रभुराया, मी तुझ्या महान कार्याचे गुण गाईन.
केवळ तुझीच न्यायप्रियता जाहीर करीन.
हे देवा, लहानपणापासून तू मला शिकवत आला आहेस
आणि आजवर मी तुझी अलौकिक कृत्ये जाहीर करीत आलो आहे.
Psalm 71:3-4a, 5-6ab, 16-17
My mouth is filled with your praise, and I will sing your glory!
Be my rock, my constant refuge,
a mighty stronghold to save me,
for you are my rock, my stronghold.
My God, free me from the hand of the wicked. R
It is you, O Lord, who are my hope,
my trust, O Lord, from my youth.
On you I have leaned from my birth;
from my mother's womb, you have been my help.
I will come with praise of your might, O Lord;
I will call to mind your justice, yours, O Lord, alone.
O God, you have taught me from my youth,
and I proclaim your wonders still.R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
लोकांना निशाणी म्हणून नेमलेल्या इशायच्या मुला , ये आणि आता आमचे तारण कर, विलंब करू नकोस.
आलेलुया!
Acclamation:
O Root of Jesse's stem, sign of God's love for all his people: come to save us without delay!
.