Marathi Bible Reading | Wednesday 18th December 2024 | 3rd Week of Advent

आगमनकाळातील तिसरा सप्ताह 

बुधवार १८ डिसेंबर २०२४

  ✝️ 

 तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव 'येशू' असे ठेव. कारण तो आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे."

She will bear a son, and you shall call his name Jesus, for he will save his people from their sins.

संत वुनिबाल्ड  

मठाधिकारी, वर्तनसाक्षी (७०२-६१)

 ✝️
आम्हाबरोबर देव. प्रभूयेशू ख्रिस्त सामान्य, गरिब, गरजवंत व दुःखी-कष्टी असलेल्या सर्वांबरोबर राहीला.त्याने भुकेल्यांस अत्र दिले, आंधळ्यास डोळे दिले, मुक्यास वाचा दिली, आजारी व भुतग्रस्त माणसांना निरोगी आणि बंधमुक्त केले, मेलेल्यांस जिवंत केले, सर्वांसाठी तारणारा, मुक्तीदाता, रक्षणकर्ता, सांभाळकर्ता असा परमेश्वर माणसांसाठी बनला. माणूस ह्या आगमनकाळात आम्हांबरोबर देव, इम्मानुएल च्या आगमनाची पुन्हा  आपण एकदा वाट पाहत आहोत. पवित्र कुमारी मरीया व योसेफ ह्यांनी त्याच्या आगमनाची तयारी केली, असे आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो. आपल्या सर्वांच्या जीवनात नव्याने जन्म घेण्यासाठी प्रभूयेशू येत आहे. त्याला अंतःकरणापासून स्वीकारण्यासाठी आपण तयारी करु या.


पहिले वाचन यिर्मया २३:५-८ 
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"दावीदच्या वंशवृक्षाला शुद्ध अंकुर फुटेल असे मी करीन."

प्रभू म्हणतो, “पाहा असा काळ येणार आहे की, ज्यात दावीदच्या वंशवृक्षाला शुद्ध अंकुर फुटेल असे मी करीन. तो राजा म्हणून सुज्ञतेने राज्य करील. संपूर्ण देशभर तो न्यायनीती व सचोटी यांना उचलून धरील. प्रभूचे हे बोल आहेत. त्याच्या कारकिर्दीत यहुदाचे लोक सुरक्षित वावरतील. इस्राएलचे लोक शांतिसमाधानाने राहतील. 'प्रभू आमचे नीतिनिधान' असे नाव लोक त्याला देतील.' "
प्रभू म्हणतो, “यास्तव पाहा, असे दिवस येणार आहेत की, इस्राएल लोकांची मिसर देशातून सुटका करणाऱ्या जिवंत प्रभूची शपथ, असे लोक म्हणणार नाहीत. त्याऐवजी उत्तरेकडच्या आणि ज्या देशात प्रभूने इस्राएल घराण्यातील लोकांना पांगवले होते तेथून त्यांना परत आपल्या मायदेशी आणणाऱ्या जिवंत प्रभूची शपथ, असे ते म्हणतील. मग ते आपल्या स्वतःच्या देशात राहतील.

प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading :Jeremiah 23:5-8

"Behold, the days are coming, declares the Lord, when I will raise up for David a righteous Branch, and he shall reign as king and deal wisely, and shall execute justice and righteousness in the land. In his days Judah will be saved, and Israel will dwell securely. And this is the name by which he will be called: The Lord is our righteousness. "Therefore, behold, the days are coming, declares the Lord, when they shall no longer say, 'As the Lord lives who brought up the people of Israel out of the land of Egypt', but 'As the Lord lives who brought up and led the offspring of the house of Israel out of the north country and out of all the countries where he had driven them! Then they shall dwell in their own land."
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र : ७२:१-२,१२-१३,१८-१९
प्रतिसाद :  त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल. 
१) हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे. 
या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे. 
म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने 
 न्यायनिवाडा करील. तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल..

२) त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला 
तसेच गरजवंत आणि असहाय्य लोकांनादेखील 
तो सोडवील गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर 
तो दया करील, गरजवंताच्या जिवांचे तो रक्षण करील.

३) प्रभूदेवाला धन्यवाद असो. 
तोच इस्राएलचा देव, अलौकिक कृत्ये करतो.
 त्याचे थोर नाम सदासर्वदा सुवंदित असो. 
त्याचा महिमा साऱ्या भूतलावर पसरो आमेन ! आमेन !

Psalm 72:1-2, 12-13, 18-19
In his days shall justice flourish, and great peace forever.

O God, give your judgment to the king.
 to a king's son your justice, 
that he may judge your people in justice, 
and your poor in right judgment. R 

For he shall save the needy when they cry,
 the poor, and those who are helpless.
He will have pity on the weak and the needy, 
and save the lives of the needy. R

Blest be the Lord, God of Israel,
 who alone works wonders, 
ever blest his glorious name.
 Let his glory fill the earth. Amen! R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
सिनाय पर्वतावर मोशेला आज्ञा देणाऱ्या इस्त्राएल घराण्याच्या हे अधिपते, ये आणि आपले हात पुढे करून आमचे संरक्षण कर.
आलेलुया!

Acclamation: 
 O Leader of the House of Israel, giver of the Law to Moses on Sinai: come to rescue us with your mighty power!

.
शुभवर्तमान मत्तय १:१८-२४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"दावीदचा पुत्र योसेफ ह्याच्याशी वाड् निश्चय झालेल्या मरियेपासून येशूचा जन्म झाला." 

येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली: त्याची आई मरीया हिचा योसेफशी वाङ् निश्चय झालेला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच, पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपला वाड् निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीद पुत्रा, योसेफ, आपली बायको म्हणू मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव 'येशू' असे ठेव. कारण तो आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे."या घटना घटण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्ट्यामार्फत वदवले होते, “कुमारी गर्भवती होईल. तिला मुलगा होईल. त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल."मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 1:18-24

The birth of Jesus Christ took place in this way. When his mother Mary had been betrothed to Joseph, before they came together, she was found to be with child from the Holy Spirit. And her husband Joseph, being a just man and unwilling to put her to shame, resolved to send her away quietly. But as he considered these things, behold, an angel of the Lord appeared to him in a dream, saying, "Joseph, son of David, do not fear to take Mary as your wife, for that which is conceived in her is from the Holy Spirit. She will bear a son, and you shall call his name Jesus, for he will save his people from their sins. All this took place to fulfil what the Lord had spoken by the prophet: "Behold, the virgin shall conceive and bear a son, and they shall call his name Emmanuel" (which means, God with us). When Joseph woke from sleep, he did as the angel of the Lord commanded him: he took his wife.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन:आजच्या शुभवर्तमानात आपल्याला कुमारी मरियेमध्ये मुलाला जन्म देणारी भविष्यवाणी पूर्ण होत असल्याचे आढळते. यहुदी समाजाकडून जिवे मारण्याचा धोका असूनही मरीयेने देवाला होय म्हटले आणि अशाप्रकारे बाळ येशूच्या येण्याचे देवाचे वचन पूर्ण करण्यात सहकार्य केले. पण मरीयेशिवाय आणखी एक व्यक्ती होती ज्याने देवाच्या योजनेत सहकार्य केले. आणि ती व्यक्ती म्हणजे संत योसेफ होता. लग्नाआधी मरीया गरोदर होती हे जाणून योसेफाने गुप्तपणे तिच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. परंतु स्वप्नातील देवदूताने मरीयेला पत्नी म्हणून घेण्याच सल्ला दिल्यानंतर, योसेफानेही परिणामांची पर्वा न करता देवाच्या इच्छेला होय म्हणणे पसंत केले. योसेफ खरोखरच एक देवभीरू आणि नीतिमान माणूस होता. मरिया आणि योसेफ या दोघांनीही जगाची भीती बाळगण्यास नकार दिला आणि धैर्याने त्यांच्या जीवनात येशूचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. या आगमन काळात आपणही जागतिक मार्गात न गुंतता ईश्वरी मार्गाला प्राधान्य देऊया व बाळ येशूचे स्वागत करण्यासाठी मनाची तयारी करू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, आमच्या तारणदात्या प्रभू आमच्या जीवनात ये, आमच्या  अंतःकरणात ये, आम्हाला तुझा प्रकाश व कृपा दे, आमेन.

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या