सामान्यकाळातील २८ वा सप्ताह
सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५
ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते,
"This generation is an evil generation. It seeks for a sign,
संत एडवर्ड
राजा, वर्तनसाक्षी (१००४-१०६६)
प्रभू येशू तारणारा आहे असा विश्वास ठेवणाऱ्या व त्याचे अनुकरण करणाऱ्यांच्या जीवनात अद्भूत दैवी चिन्हे अनुभवायला मिळतात परंतु संशय, अविश्वास आणि भीतीने त्रस्त झालेल्या शास्त्री परुश्यांनी प्रभू येशूकडे चिन्हांची मागणी प्रथम केली. पहिल्याने चिन्ह मग विश्वास ठेवणार असे सांगणाऱ्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त आज सांगत आहे, ' ही पीढी दुष्ट आहे, ही चिन्ह मागते.'
परमेश्वराने योनाला पाचारण करून नीनवेकरांस पश्चातापाचा संदेश दिला. नीनवेकरांसाठी चिन्ह झालेल्या योनाच्या संदेशावर त्यांनी विश्वास ठेवला. योनाप्रमाणेच प्रभू म्हणतो, 'मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला चिन्ह होईल. तीन दिवस योना माशाच्या पोटात होता, मात्र प्रभू येशू तीन दिवसांनंतर पुनरुत्थित होणार होता, हे महान चिन्ह सर्व मानवजातीसाठी तारणाचे चिन्ह बनले. परमेश्वराचा चमत्कार आपल्या जीवनात व्हावा असे वाटत असेल तर त्याची महानता अनुभवण्यासाठी पंचेद्रियांच्या पलिकडे जाऊन त्याचा शोध घ्यावा लागेल. प्रभू येशूच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याच्या सहवासाचा अनुभव आम्हाला घेता आला पाहिजे.आपल्या जीवनात अनेक चिन्हाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. निसर्ग, निसर्गातील घडामोडी, पक्षी, प्राणीमात्र, आपले बंधु-भगिनी आपले कार्य, संपर्कातील अनेक माणसे अशा सर्वांतून दररोज अनेक चिन्हे आपल्याला अनुभवावयास मिळतात. आपण अंतर्मूख बनून प्रभूचे अस्तित्व अनुभवण्यासाठी प्रेरणा मागू या.
पहिले वाचन : रोमकरांस १:१-७
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन
"सर्व राष्ट्रांनी श्रद्धा बाळगावी व आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा आणि प्रेषितपद ही मिळाली."
पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि पवित्र आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्याद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषितपद ही मिळाली, त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांनी श्रद्धा बाळगावी व आज्ञापालन करावे. त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहा, त्या तुम्हांला देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा आणि शांती असो.
प्रभूचा शब्द.
First Reading :Romans 1:1-7
Paul, a servant of Christ Jesus, called to be an apostle, set apart for the gospel of God, which he promised beforehand through his prophets in the holy Scriptures, concerning his Son, who was descended from David according to the flesh and was declared to be the Son of God in power according to the Spirit of holiness by his resurrection from the dead, Jesus Christ our Lord, through whom we have received grace and apostleship to bring about the obedience of faith for the sake of his name among all the nations, including you who are called to belong to Jesus Christ. To all those in Rome who are loved by God and called to be saints: Grace to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९८: १-४
प्रतिसाद : परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे,
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली
सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे
तारणकार्य पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.
Psalm 98:1, 2-3ab, 3cd-4
R : The Lord has made known his salvation.
O sing a new song to the Lord,
for he has worked wonders.
His right hand and his holy arm
have brought salvation.R
The Lord has made known his salvation,
has shown his deliverance to the nations.
He has remembered his merciful love
and his truth for the house of Israel. R
All the ends of the earth have seen
the salvation of our God.
Shout to the Lord, all the earth;
break forth into joyous song,
and sing out your praise..R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Today, harden not your hearts, but listen to the voice of the Lord.
R. Alleluia, alleluia.
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही."
बराच मोठा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता येशू त्यांना म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील, कारण शलमोनचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे, निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 11:29-32
At that time. When the crowds were increasing, Jesus began to say. "This generation is an evil generation. It seeks for a sign, but no sign will be given to it except the sign of Jonah. For as Jonah became a sign to the people of Nineveh, so will the Son of Man be to this generation. The queen of the South will rise up at the judgment with the men o this generation and condemn them, for she came from the ends of the earth to hear the wisdom of Solomon, and behold, something greater than Solomon is here. The men of Nineveh will rise up at the judgment with this generation and condemn it, for they repented at the preaching of Jonah, and behold, something greater than Jonah is here
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
संत पॉलने रोमच्या लोकांना कधी सुवार्ता सांगितली नव्हती किंवा तेथील ख्रिस्तमंडळी स्थापन केलेली नव्हती. मात्र तेथे जाण्याचा त्याचा हेतू होता. त्यामुळे तो आता त्यांना तशा स्वरूपाचं पत्र लिहितो एकीकडे तो रोमन लोकांना देवाने कसे निवडून घेतलेले आहे तेसांगतो तर दुसरीकडे आपले प्रेषितपदसुद्धा अधिकृतरीत्या देवाने दिलेले आहे असे स्पष्ट करतो. श्रद्धावंत आणि धर्मोपदेशक / धर्मशिक्षक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात पावित्र्याचे तरंग उमटू लागतात. मात्र त्यासाठी दोन्ही बाजू कृपेच्या अवस्थेत असणे गरजेचे आहे. दुर्दैवाने येशूच्या काळातील लोकांनी येशूचे खरे रूप ओळखले नाही. त्यांनी त्याच्याकडे चिन्ह मागितले. योना आणि शल्मोन ह्या दोन महान व्यक्तींपेक्षाही येशू थोर असल्याचे येशूने स्पष्ट केले. पश्चात्ताप करून आणि दैवी ज्ञानाचा वापर करून मनुष्य सदैव कृपेच्या अवस्थेत राहू शकतो. त्यासाठी कुठलेही चिन्ह मागण्याची गरज नसते तर परमेश्वर आपल्याठायी कसा कार्य करीत आहे ते समजून घेण्यासाठी दैवी कृपेची गरज असते. फातिमा येथे दर्शन देऊन पवित्र मरियेने मानवजातीसाठी ईश्वरी कृपेचा खजिना खुला केलेला आहे.
माझ्या जीवनात देवाची कृपा कशा प्रकारे कार्यरत आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा सहवास, तुझी जवळिकता अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या