Marathi Bible Reading | 28th Sunday in Ordinary Time | 12th October 2025

सामान्यकाळातील २८ वा रविवार  

दि. १२ ऑक्टोबर २०२५

“ऊठ, जा, तुझ्या विश्वसाने तुला बरे केले आहे."
Arise, go thy way; for thy faith hath made thee whole.

दहाचे दहा शुद्ध झाले होते ना ? मग नऊ जण कोठे आहेत? 

and where are the nine? There is no one found to return and give glory to God, but this stranger.


 अलीशाच्या सांगण्यावरुन नामानने योर्देन नदीत सात वेळा बुचकळ्या मारुन स्नान केले, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलांच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नामानने अविश्वास दाखविला परंतु  नंतर त्याने विश्वास ठेवला व त्याला शुद्धी प्राप्त झाली. नामानाने कृतज्ञता व्यक्त करुन खऱ्या देवाची उपासना करण्याचा निर्धार केला.
 दहा कुष्ठरोगी प्रभू येशूजवळ येऊन विनंती करतात, प्रभू येशूच्या ह्या वचनावर विश्वास ठेवून वाटेने जाता जाता ते सर्व कुष्ठरोगी शुद्ध झाले. पश्चातापी  अंतःकरणाने प्रभूला शरण जाऊन, विश्वासाने प्रभूच्या वचनाप्रमाणे आचरण  करणाऱ्याच्या जीवनात चमत्कार घडत असतो,  श्रद्धेची कसोटी घेतली जाते म्हणूनच आपली श्रद्धा व परमेश्वरावरील भक्ति दृढ असायला हवी. आपण आपल्या देवावरील श्रद्धेवर  चिंतन करु या. 

बरे झालेल्या दहा कुष्ठरोग्यांपैकी जो परराष्ट्रीय होता, त्याने परत येऊन येशूला धन्यवाद दिले. देव कनवाळू, दयाळू व प्रेमळ आहे, आपल्या जीवनात आपल्याला दिलेल्या असंख्य दानाबद्धल आपण कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे.
✝️   
पहिले वाचन :२ राजे ५:१४-१७
वाचक :  राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"नामान अलिशाकडे परत येऊन त्याने देवाचा स्वीकार केला. " 
महारोगी नामानने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.
नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीवर इस्राएलबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे, तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा." तेव्हा तो म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सेवेला मी असतो त्याच्या जीविताची शपथ, मी काहीएक घेणार नाही.” त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांवर नेता येईल एवढी माती द्या. कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading :
Second Kings 5: 14-17
Then he went down, and washed in the Jordan seven times: according to the word of the man of God, and his flesh was restored, like the flesh of a little child, and he was made clean. And returning to the man of God with all his train, be came, and stood before him, and said: In truth, I know there is no other God in all the earth, but only in Israel: I beseech thee therefore take a blessing of thy servant.
But he answered: As the Lord liveth, before whom I stand, I will receive none. And when he pressed him, he still refused. And Naaman said: As thou wilt: but I beseech thee, grant to me thy servant, to take from hence two mules’ burden of earth: for thy servant will not henceforth offer holocaust, or victim, to other gods, but to the Lord.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ९८:१-४
प्रतिसाद :  परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे.

१ )परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या उजव्या हाताने, 
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.

 २) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे, 
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता 
आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.

३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे 
तारणकार्य पाहिले आहे. 
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.

Psalm   Psalms 98: 1, 2-3ab, 3c-4
R. (2b) The Lord has revealed to the nations his saving power.

1 Sing ye to the Lord anew canticle: 
because he hath done wonderful things. 
His right hand hath wrought for him salvation,
 and his arm is holy.
R. The Lord has revealed to the nations his saving power.

2 The Lord hath made known his salvation: 
he hath revealed his justice in the sight of the Gentiles.
3ab He hath remembered his mercy 
his truth toward the house of Israel.
R. The Lord has revealed to the nations his saving power.

3c All the ends of the earth have seen 
the salvation of our God.
4 Sing joyfully to God, all the earth; 
make melody, rejoice and sing.
R. The Lord has revealed to the nations his saving power.

दुसरे वाचन  २ तिमथी  २:८-१३
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 
“जर आपण धीराने सोसतो तर ख्रिस्ताबरोबर राज्य करू."

माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला, दावीदच्या संतानातील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे. तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे, म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे. 
जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: Second Timothy 2: 8-13
Be mindful that the Lord Jesus Christ is risen again from the dead, of the seed of David, according to my gospel.Wherein I labour even unto bands, as an evildoer; but the word of God is not bound. Therefore I endure all things for the sake of the elect, that they also may obtain the salvation, which is in Christ Jesus, with heavenly glory. A faithful saying: for if we be dead with him, we shall live also with him. If we suffer, we shall also reign with him. If we deny him, he will also deny us. If we believe not, he continueth faithful, he can not deny himself.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!


Acclamation: 
First Thessalonians 5: 18
R. Alleluia, alleluia.
18 In all circumstances, give thanks, for this is the will of God for you in Christ Jesus.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक १७:११-१९
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय ?" 
येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्या प्रदेशामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठ्यामोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा." त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एकजण आपण बरे झालो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, दहाचे दहा शुद्ध झाले होते ना ? मग नऊ जण कोठे आहेत? ह्या एकावाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय ? मग त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वसाने तुला बरे केले आहे."

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

Gospel Reading :
Luke 17: 11-19
And it came to pass, as he was going to Jerusalem, he passed through the midst of Samaria and Galilee. And as he entered into a certain town, there met him ten men that were lepers, who stood afar off; And lifted up their voice, saying: Jesus, master, have mercy on us. Whom when he saw, he said: Go, shew yourselves to the priests. And it came to pass, as they went, they were made clean. And one of them, when he saw that he was made clean, went back, with a loud voice glorifying God. And he fell on his face before his feet, giving thanks: and this was a Samaritan. And Jesus answering, said, Were not ten made clean? and where are the nine? There is no one found to return and give glory to God, but this stranger. And he said to him: Arise, go thy way; for thy faith hath made thee whole.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 

परमेश्वराचा अनुभव आणि आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या ह्यांचा मेळ घालण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पुढील गोष्टी जाणवतातः 
१) आपल्या समस्यांमुळे देवाची कृपा साठविण्यासाठी आपली हृदये तयार होतातः नामान हा सीरियाचा सेनापती होता. त्याला कुष्ठरोग झाला होता. तो अलिशा संदेष्ट्याकडे येतो. संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे तो यादेंन नदीत सात वेळा बुचकळ्या मारतो आणि बरा होतो. तेव्हा त्याला पटते की ह्या भूतलावरयाहवेशिवाय अन्य देव नाही. तो दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा यापुढे करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. त्याला कुष्ठरोग झाला नसता तर तो अलिशाच्या संपर्कात कधीच आला नास्ता आणि त्याला देवाचा अनुभव कधीच आला नसता. 
२) आपल्या समस्या उज्ज्वल भविष्याच्या कक्षा रुंदावतातः संत पॉल स्वतःला येशूचा बंदिवान मानतो. आपल्या ह्या दुःखसहनात उद्याचे वैभवशाली जीवन दडलेले आहे अशी त्याची खात्री पटते. 
३) आपल्या समस्या आपल्याला देवाच्या अधिक जवळ घेऊन येतातः शुभवर्तमानातील दहा कुष्ठरोगी येशूच्या जवळ येण्यासही धजत नव्हते. ते दूर उभे राहून त्याच्याकडे विंनती करीत होते की, आम्हावर दया करा. परंतु ते बरे होताच त्यातील एक जण येऊन येशूच्या पायांपाशी लोळण घेतो. खरे पाहता, येशूने सर्वांना आज्ञा केलेली होती की त्यांनी जाऊन याजकाला दाखवावे. याजकाने तपासून पाहिल्यानंतरच त्यांना रीतसर लोकसमुदायामध्ये सहभागी होता येणार होते. येशूचे आभार मानण्यासाठी परतलेला कुष्ठरोगी शोमरोनी होता. त्याला गरिझिम पर्वतावर जावे लागले असते. परंतु तो येशूलाच याजक मानून त्याच्या चरणाशी पडतो. कुष्ठरोगामुळे त्याला सामाजिक व अधार्मिक दृष्ट्या उपेक्षित पणाचे जीवन जगावे लागले होते. त्याच्यात आणि देवात, त्याच्यात आणि लोकांत एक प्रकारचे अंतर निर्माण झालेले होते परंतु ह्या अनुभवाने ते अंतर साफ नाहीसे झाले.
एक श्रद्धावंत ह्या नात्याने मी माझ्या समस्यांकडे कसा पाहतो/कशी पाहते? माझ्या श्रद्धेमुळे मला माझ्या समस्या वेगळ्या प्रकारे समजून घेण्यास मदत होत असते का?
प्रार्थना : हे प्रभू प्रमेश्वरा, दयेने आमच्यावर कृपादृष्टी कर, आमचा विश्वास वाढव  आणि आम्हाला आरोग्यदान दे, आमेन..




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या