Marathi Bible Reading | 28th week in ordinary Time | Tuesday 14th October 2025

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह 

मंगळवार  दि. १४ऑक्टोबर २०२५

जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी शुद्ध आहे."
But give as alms those things that are within, and behold, everything is clean for you. 

संत कलिस्टस पहिले 

परमगुरुस्वामी , रक्तसाक्षी (.... -२२२)


 शास्त्री-परूशी ह्यांना धार्मिकता म्हणजे नियमाधिष्ठीत बाह्य व पोकळ  भक्तीचा देखावा वाटत होती. केवळ बाह्य कर्मकांडाला महत्व देणाऱ्या परूशी व शास्त्र्यांचा प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात निषेध करीत आहे. प्रभू त्यांना  म्हणत आहे, 'तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.'

आपण सुध्दा अनेकदा आपले  बाह्य शरीर स्वच्छ ठेवून पोकळ भक्तीचा देखावा करीत असतो. चांगला पोषाख करुन सभ्यपणाचा आव आणायचा मात्र अंतर्यामी स्वार्थ, हेवा, मत्सर, द्वेष, राग, जुलूम अशा प्रकारच्या दुष्टपणाने आचरण करणाऱ्या सर्वांचा प्रभू आज निषेध करीत आहे. अंतःकरणात साचलेला हा अशुध्दपणा प्रभू येशू आज बाहेर  काढण्यास सांगत आहे. प्रभू म्हणतो, 'जे आंत आहे त्याचा दानधर्म करा म्हणजे  पाहा तुम्हांस सर्व शुद्ध आहे.' परमेश्वराला अपेक्षित शुद्धता, चांगुलपणा आणि| परोपकार तसेच परमेश्वराठायी सर्व समर्पित करण्यासाठी आज प्रभूकडे विशेष  कृपा मागू या.

 विश्वासाने प्रभूच्या आज्ञा आपल्याला पाळता  याव्यात आणि सत्य वचनांवर आधारित अशी प्रभूची उपासना व भक्ती  आपल्याला करता यावी म्हणून नम्रतेने प्रभू चरणी नतमस्तक होऊ या.  आध्यात्मिकतेत वाढत असताना पवित्र आत्म्याची फळे म्हणजेच 

प्रीति,  आनंद,  सहनशीलता, सौम्यता, परोपकार, शांती, चांगुलपणा व विश्वासूपणाने जीवन जगण्यासाठी कृपा मागू या.



पहिले वाचन :  रोमकरांस  १:१६-२५
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन 

"देवाला ओळखूनसुद्धा मनुष्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही. "

मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेल्लेण्याला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे,नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रालेखाप्रमाणे हे आहे. वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर आणि अनीतिवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य आणि देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंध:काराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू आणि सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली.
    ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, अशासाठी की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्यांऐवजी निर्मितांची भक्ती आणि सेवा केली, तो निर्माणकर्ता तर युगानुयुगे धन्यवादित आहे. आमेन.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 1:16-25

Brethren: I am not ashamed of the gospel, for it is the power of God for salvation to everyone who believes, to the Jew first and also to the Greek. For in it the righteousness of God is revealed from faith for faith, as it is written, "The righteous shall live by faith." For the wrath of God is revealed from heaven against all ungodliness and unrighteousness of men, who by their unrighteousness suppress the truth. For what can be known about God is plain to them, because God has shown it to them. For his invisible attributes, namely, his eternal power and divine nature, have been clearly perceived, ever since the creation of the world, in the things that have been made. So they are without excuse. For although they knew God, they did not honour him as God or give thanks to him, but they became futile in their thinking, and their foolish hearts were darkened. Claiming to be wise, they became fools, and exchanged the glory of the immortal God for images resembling mortal man and birds and animals and creeping things. Therefore God gave them up in the lusts of their hearts to impurity, to the dishonouring of their bodies among themselves, because they exchanged the truth about God for a lie and worshipped and served the creature rather than the Creator, who is blessed for ever! Amen.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १९: २-५
प्रतिसाद :आकाश देवाचा महिमा वर्णिते.

१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. 
दिवस दिवसाशी संवाद करतो, 
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

२) वाचा नाही, शब्द नाही, 
त्यांची वाणी ऐकू येत नाही. 
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो,
त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात


Psalm 19:2-3, 4-5

The heavens declare the glory of God.

The heavens declare the glory of God, 
and the firmament proclaims
the work of his hands.
Day unto day conveys the message, 
and night unto night imparts the knowledge. R

No speech, no word,
whose voice goes unheeded; 
 their sound goes forth through all the earth, 
their message to the utmost bounds of the world. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 आलेलुया!
Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
The word of God is living and active, discerning the thoughts and intentions of the heart.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान लूक   ११:३७-४१
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“दानधर्म करा म्हणजे सर्व काही तुमच्याकरिता कल्याणदायक होईल."

येशू बोलत आहे इतक्यात एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली, मग तो आत जाऊन भोजनाला बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, "तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा ह्यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग स्वच्छ केला, त्याने अंतर्भागही स्वच्छ केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी शुद्ध आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 11:37-41

At that time: While Jesus was speaking, a Pharisee asked him to dine with him, so he went in and reclined at table. The Pharisee was astonished to see that he did not first wash before dinner. And the Lord said to him, "Now you Pharisees cleanse the outside of the cup and of the dish, but inside you are full of greed and wickedness. You fools! Did not he who made the outside make the inside also? But give as alms those things that are within, and behold, everything is clean for you.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
मनुष्य जेव्हा साफसफाई करतो, मग ती घराची असो, भांड्यांची असो की कपड्यांची असो तेव्हा ती तो केवळ बाहेरून करून समाधानी होत नाही. तशाने ती बाहेरून स्वच्छ आहे हे लोकांना दाखविणे हा हेतू साध्य होऊ शकतो. मात्र केवळ लोकांना दाखविणे हा कोणतीही गोष्ट स्वच्छ करण्यामागचा हेतू नसतो तर तिचा योग्य तो वापर योग्य पद्धतीने करणे शक्य व्हावे हा हेतू असतो. येशू एका परुश्याच्या घरी भोजनास गेलेला होता. येशूने हातपाय धुतले नाहीत हे पाहून तो परुशी अस्वस्थ झाला. येशूने त्याच प्रसंगाचा आधार घेत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्याला आणि आपणा सर्वांना शिकविलेली आहे: ज्याप्रमाणे आपण ताटवाटी आतून बाहेरून साफ करतो तसे बाह्य वर्तनाबरोबर आपले अंतःकरणही शुद्ध असायला हवे. जे आत आहे त्याचा दानधर्म कराह्याचा अर्थ परमेश्वराने मुळात माणसाला सदभावनेने भरून टाकलेले आहे. ती सदभावना सर्वांना दाखविल्याने अर्धेअधिक प्रश्न सुटणार आहेत.
अंतःकरणाच्या स्वच्छतेविषयी मी कोणकोणती पावले उचलायला हवीत ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, अंतर्यामी शुध्द व पवित्र बनण्यास आणि खऱ्या अंतःकरणाने तुझी उपासना व भक्ती करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या