सामान्यकाळातील २७ वा सप्ताह
शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५
मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे.
if it is by the finger of God that I cast out demons, then the kingdom of God has come upon you.

संत फ्रान्सिस बोर्जिया
वर्तनसाक्षी (१५१०-१५७२)
✝️
येशुसंघामध्ये राहून संत फ्रान्सिस बोर्जिया ह्याने बरीच प्रगती केली. संत इग्नेशिअसने त्याला प्रथम खडतर मिशन भागात पाठविले. तिथे आपली पात्रता सिद्ध केल्यानंतर त्याला स्पेन, पोर्तुगाल, ईस्ट व वेस्ट इंडिज भागात (कार्यकारी) कमिशनर जनरल म्हणून नियुक्त केले. ह्या कार्यासाठी पुढील सात वर्षे त्याला बराच प्रवास करावा लागला. त्याने बरीच महाविद्यालये उघडली. वीस नवशिष्यालये बांधली आणि सर्वत्र येशूसंघियांसाठी नवनवे मित्र जमविले. येशूसंघियांचे दुसरे जनरल फा. लायनेझ ह्यांनी फ्रान्सिसला १५६१ साली विकर जनरल ही पदवी दिली. चार वर्षानंतर फा. लायनेस ह्यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सिस जगभरच्या येशूसंधियांचे तिसरे फादर जनरल म्हणून निवडले गेले.त्याच वेळी पोप पायस पाचवे हे संत पीटरच्या आसनावरून ख्रिस्तसभेचा कारभार पाहात होते. धार्मिक सुधारणावादी चळवळीच्या त्या काळात संत चार्ल्स बोरोमियो, संत फिलीप नेरी आणि संत पीटर कनेशिअस सारखे ख्रिस्तसभेचे सरदार पोपमहाशयांना आधार देत होते. त्यात आता फ्रान्सिस बोर्जिया ह्यांची भर पडली.येशूसंघियांचे जनरल या नात्याने संत फ्रान्सिस बोर्जिया ह्यांनी अलिकडेच स्थापन झालेला येशूसंघ नावारूपाला आणला, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि पोलंडसारख्या देशात त्यांनी ३१ नवीन महाविद्यालये स्थापन केली. त्यांच्या कारकीर्दीत येशुसंघाचे कार्य फ्लोरिडा, मेक्सिको, पेरू आणि क्रेतसारख्या बेटांपर्यंत जाऊन पोहचले. तसेच जपानसारख्या देशात ६६ येशूसंघीय मिशनऱ्यांनी ख्रिस्तसभेच्या वाढत्या वेलीला आपल्या रक्तसाक्षित्वाने सिंचन घातले.
पोप महाशयांच्या आदेशानुसार स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्ससारख्या देशांशी बोलणी करण्यासाठी जात असताना १० ऑक्टो. १५७२ साली संत फ्रान्सिस बोर्जिया ह्यांना देवाज्ञा झाली. पोप क्लेमेंट दहावे ह्यांनी १६७० साली त्यांना संताच्या मालिकेमध्ये समाविष्ट केले. देऊळमातेने त्यांना पोर्तुगालचा आश्रयदाता संत म्हणून गौरविले आहे.
चिंतन : लोकांनी आपल्याला कसेही वागविले तरी आपण मात्र सत्पथावरील आपला प्रवास थांबविता कामा नये. विशेषत: देवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करीतच राहावे. - संत फ्रान्सिस बोर्जिया
पहिले वाचन : योएल १:१३-१५;२:१-२
वाचक : योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे."
याजकहो, गोणपाट घालून शोक करा. सेवा करणाऱ्यांनो, विलाप करा. माझ्या देवाचे सेवकांनो, या गोणपाटावर पडून रात्र घालवा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण आणिपेयार्पण येण्याचे बंद झाले आहे. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांना आणि देशात राहणाऱ्या सर्वांना जमवा. आणि परमेश्वराला आरोळी मारा.
त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशसमय असा तो येत आहे.
सियोनेत कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबती वाजवा. देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे. तो येऊन ठेपला आहे.
अंधाराचा आणि औदासिन्याचा दिवस! मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. केवढे विशाल व बलवान सैन्य हे! रात्रीने झाकावे तसे या सैन्याने पर्वत झाकून टाकले आहेत! हे लोक केवढे महान! केवढे समर्थ आहेत!
त्यांच्यासारखे लोक पूर्वी कधी कोणी पाहिले नव्हते आणि जगाच्या पुढील सर्व पिढ्यामध्ये असे लोक पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाहीत!
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Joel :1:13-15:2:1-2
Put on sackcloth and lament. O priests: wail. O ministers of the altar. Go pass the night in sackcloth. O ministers of my God! Because grain offering and drink offering are withheld from the house of your God. Consecrate a fast; call a solemn assembly. Gather the elders and all the inhabitants of the land to the house of the Lord your God, and cry out to the Lord. Alas for the day! For the day the Lord is near, and as destruction from the Almighty it comes. Blow a trumpet in sound an alarm on my holy mountain! Let all the inhabitants of the land tremble, the day of the Lord is coming it is near, a day of darkness and gloom, a day of cloud and thick darkness! Like blackness there is spread upon the mountains a great and powerful people; their like has never been before, nor will be again after them though the years of all generations.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९: २-३,६,१६,८-९
प्रतिसाद : परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील.
१) मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन,
तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन.
मला तुझ्या ठायी हर्ष आणि उल्हास होईल,
हे परात्परा, मी तुझ्या नामाचे स्तवन गाईन.
२) तू राष्ट्रांना धमकाविले आहेस,
दुर्जनांचा तू नाश केला आहेस,
तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस.
राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत,
त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत.
३) परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे.
त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापले आहे.
तोच जगाचा यथार्थ न्याय करील,
तो लोकांना खरा न्याय देईल.
9:2-3, 6 and 16, 8-9
The Lord will judge the world with justice
I will praise you, Lord with all my heart:
all your wonders I will confess .
I will rejoice in you and be glad, and sing
Psalm to your name, O Most High R
You have rebuked the nations,
destroyed the wicked:
You have wiped out their name
The nations have fallen in the pit which they made;
their feet have been caught in the snare they laid. R
But the Lord sits enthroned forever;
he has set up his throne for judgment.
He will judge the world with justice;
he will govern the peoples with equity. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia: Matthew 11: 25
R. Alleluia, alleluia.
Now will the ruler of this world be cast out, says the Lord; and I, when I am lifted up from the earth, will draw all people to myself.
R. Alleluia, alleluia.