Marathi Bible Reading | 27th week in ordinary Time | Thursday 9th October 2025

सामान्यकाळातील २७वा सप्ताह 

गुरुवार  दिनांक ९ ऑक्टोबर  २०२५

मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाते.And tell you, ask, and it will be given to you; seek, and you will find, knock, and it will be opened to you.

संत जॉन लिओनार्ड

-रक्तसाक्षी (१५४१-१६०९)

 ✝️ 

इटलीतील तुस्कानी शहरात जन्मलेला जॉन अगदी बालपणापासून चिंतनशील आणि प्रार्थनामय जीवन जगत होता. त्यासाठी त्याला एकांतवासाची आवड होती. लुक्का ह्या ठिकाणी एका औषधाच्या दुकानात शिकाऊ कामगार म्हणून काम करीत असतानाच त्याने धर्मगुरुपदाचा अभ्यास पूर्ण केला. गुरुदीक्षेआधीच त्याने मानवी आत्म्याचे तारण व्हावे म्हणून बरेच परिश्रम घेतले. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली.गुरुदीक्षेनंतर फा. जॉन ह्याने मोठ्या जोमाने व उत्साहाने आपले कार्य सुरू केले. इस्पितळे, तुरुंग, आणि जिथे जिथे शक्य झाले तिथे तिथे तो देवाची सुवार्ता सांगत फिरत असे. धर्मशिक्षण देणे, लोकांना प्रायश्चित्त संस्कार देणे, ह्या सर्व गोष्टी तो मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने करीत असे. मदर ऑफ गॉड धर्मगुरूंच्या संस्थेचा तो संस्थापक मानला जातो.

सुरुवातीला ही संस्था फक्त निवडक प्रापंचिकांची होती. संत जॉनच्या पावित्र्याकडे हे लोक आकर्षिले गेले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली राहणे, त्याला हवे ते सहाय्य देणे आणि विशेषत: पाप्यांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे ही कामे हे लोक करत होते. त्याचे समकालीन संत फिलीप नेरी, आणि संत जोसेफ कालासान्झ ह्या तिघांची मैत्री अतूट होती.

मिशनकार्य करणाऱ्या धर्मगुरूंच्या (तत्त्वज्ञान व ईशज्ञान) प्रशिक्षणासाठी रोममध्ये रोमन कॉलेज ऑफ प्रोपोगान्डा फिडे (श्रद्धा प्रसार) नावाची मोठी संस्था आहे, ह्या संस्थेच्या स्थापनेमध्ये संत जॉनचा सिंहाचा वाटा आहे, संत जॉनचे कार्य इतके महान होते की पोप लिओ तेरावे ह्यांनी त्याचे नाव रोमनरक्तसाक्ष्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्याच्या सन्मानार्थ मिस्साबली अर्पण करण्याची आणि दैनंदिन प्रार्थना म्हणण्याची आज्ञा आपल्या धर्मगुरूंना दिली. अशा प्रकारचा सन्मान फक्त संतपदाला पोहोचलेल्या पोपमहाशयांसाठीच राखून ठेवण्यात आलेला आहे.

ऐहिक गोष्टींपेक्षा आपण आध्यात्मिक कृपादानांसाठी देवाकडे मागणे गरजेचे आहे, क्षमाशील हृदय, प्रेमळ परस्पर स्नेहभाव, सेवा करण्याची प्रेरणा, पवित्र आत्म्याची दाने, दैवी शहाणपण व ज्ञानात वाढ व्हावी म्हणून आपण आग्रहाने प्रार्थना करायला हवी.

प्रभू येशूने म्हटलेच आहे, ' तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व  मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील' (मत्तय ६:३३). स्वत:बरोबरच गरजवंतांसाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना  करण्याची प्रेरणा लाभावी म्हणून मागू या.

पहिले वाचन : मलाखी ३:१३-४:२अ
वाचक : मलाखी या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे."
परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे. तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोलतो ? देवाची सेवा करणे व्यर्थ आहे, त्याने आज्ञापिल्याप्रमाणे आम्ही केले आणि सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो यापासून काय लाभ झाला ? आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न झाले आहेत, त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे.

तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांना बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले आणि परमेश्वराचे भय धरणारे आणि त्याच्या नावाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील, जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक आणि दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा आणि न करणारा यांच्यातला भेद तुम्हांला कळेल.

पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, सर्व गर्विष्ठ आणि सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुम्हांवर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखात आरोग्य असेल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Malachi 3:13-4:2a

"Your words have been hard against me, says the Lord. But you say, 'How have we spoken against you? You have said, 'It is vain to serve God. What is the profit of our keeping his charge or of walking as in mourning before the Lord of hosts? And now we call the arrogant blessed. Evildoers not only prosper but they put God to the test and they escape." Then those who feared the Lord spoke with one another. The Lord paid attention and heard them, and a book of remembrance was written before him of those who feared the Lord and esteemed his name. "They shall be mine, says the Lord of hosts, in the day when I make up my treasured possession, and I will spare them as a man spares his son who serves him. Then once more you shall see the distinction between the righteous and the wicked, between one who serves God and one who does not serve him. "For behold, the day is coming burning like an oven, when all the arrogant and all evildoers will be stubble. The day that is coming shall set them ablaze, says the Lord of hosts, so that it will leave them neither root nor branch. But for you who fear my name, the sun of righteousness shall rise with healing in its wings.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १:१-४,६

प्रतिसाद : देवावर विसंबून राहणारा माणूस धन्य होय.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही,
 पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही 
आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, 
पण परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, 
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.

२) जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, 
जे आपल्याला हंगामी फळ देते, 
ज्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो आहे.
 आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३) दुर्जन तसे नाहीत ते वाऱ्याने उडून 
जाणाऱ्या भुशासारखे आहेत. 
नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो..


Psalm 1:1-2, 3, 4 and 6
Blessed the man who has placed his trust in the Lord.

Blessed indeed is the man 
who follows not the counsel of the wicked 
nor stands in the path with sinners, 
nor abides in the company of scorners, 
but whose delight is the law of the Lord, 
and who ponders his law day and night. R

He is like a tree that is planted 
beside the flowing waters,
that yields its fruit in due season, 
and whose leaves shall never fade; 
and all that he does shall prosper. R.

Not so are the wicked, not so! 
For they, like winnowed chaff, 
shall be driven away by the wind. 
For the Lord knows the way of the just,
 but the way of the wicked will perish. R.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
 हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
 आलेलुया!


Acclamation: 
 Alleluia: 
R. Alleluia, alleluia.
Open our hearts, O Lord, that we may pay attention to the words of your Son.
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान    लूक  ११:५-१३ 
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुमच्यामधला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, 'मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही.' पण मित्र आतून उत्तर देईल, 'मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही.' मी तुम्हांला सांगतो, “तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.” मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाते. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल ? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल ? तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती उदारहस्ते पवित्र आत्मा देईल ?
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 11:5-13

At that time: Jesus said to his disciples, "Which of you who has a friend will go to him at midnight and say to him, 'Friend, lend me three loaves, for a friend of mine has arrived on a journey, and I have nothing to set before him'; and he will answer from within, 'Do not bother me; the door is now shut, and my children are with me in bed. I cannot get up and give you anything? I tell you, though he will not get up and give him anything because he is his friend, yet because of his impudence he will rise and give him whatever he needs. And tell you, ask, and it will be given to you; seek, and you will find, knock, and it will be opened to you. For everyone who asks receives, and the one who seeks finds, and to the one who knocks it will be opened. What father among you, if his son asks for a fish, will instead of a fish give him a serpent; or if he asks for an egg, will give him a scorpion? If you then, who are evil, know how to give good gifts to your children, how much more will the heavenly Father give the Holy Spirit to those who ask him!"
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
नीतिमान मनुष्य चांगले जीवन जगूनही त्याच्या वाटेला दुःख व संकटाचे प्रसंग येतात तर दुष्ट दुराचारी जीवन जगत असूनही त्याला चांगले दिवस पाहायला मिळतात. असे का? हा प्रश्न दाविदाला स्तोत्र ७३ मध्ये पडलेला होता. तसाच प्रश्न मलाखीच्या काळातील लोकांना पडलेला होता. संदेष्टा त्यांना व्यापक दृष्टिकोनातून पाहायला सांगतो आणि देवाचा तप्त भट्टीचा न्यायाचा दिवस येईल तेव्हा नीतिमान सोन्यांसारखे झळकतील परंतु दुष्ट मात्र भुस्कटाप्रमाणे जाळून बेचिराख होतील. थोडक्यात माणसाला फक्त सध्य स्थिती दिसते. देवाला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दिसत असतो. म्हणून माणसाने देवावर विसंबून राहायला हवे. शुभवर्तमानातयेशू मध्यरात्री आलेल्या मित्राचा दाखला देतो. इथे एकूण तीन मित्र आहेतः प्रवासातून आलेला मित्र, भाकरी मागायला आलेला मित्र आणि ज्याच्याकडे भाकरी होत्या तो मित्र. ह्या नात्यामुळे आणि त्यातून उगम पावणाऱ्या आग्रहामुळे सर्व प्रकारच्या अडी-अडचणींवर मात करून हा मित्र आपल्या मित्राची गरज भागवितो. देवाकडे आपण काय मागतो त्यापेक्षा देवाशी आपलं नातं कसं आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. ती नीतिमत्तेचं असेल तर आपल्याला संकटकाळी घाबरण्याचे काहीच कारण नाही.
परमेश्वराशी असलेल्या माझ्या नात्यामुळे मला जीवनातील प्रसंगांना सामोरे जाताना असे वाटते?

प्रार्थना :हे सामर्थ्यशाली परमेश्वरा, योग्य ते मागण्यास व शोधण्यास तसेच योग्यवेळी योग्य त्याठिकाणी ठोठावण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या