Marathi Bible Reading | Friday 5th December 2025 | 1st Week of Advent

आगमनकाळातील पहिला सप्ताह 

शुक्रवार दि.  ५ डिसेंबर ०२५

येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो म्हणाला, “तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येवो. "Then he touched their eyes, saying, According to your faith, be it done unto you.


 संत साबास 

मठाधिकारी, वर्तनसाक्षी (४३९ ते ५३२)


✝️   
आजच्या शुभवर्तमानातील दोन आंधळ्या माणसांनी प्रभू येशूला  केवळ एक आरोग्यदान देणारा संदेष्टाच नाही तर 'दावीदाचा पुत्र' म्हणून ओळखले. दावीद राजा दयाळू आणि प्रजेचे रक्षण करणारा महान देशभक्त होता. दावीदाच्या कुळातून जन्मलेला प्रभू येशू तारणारा मशीहा असल्याची  ओळख त्या आंधळ्यांना पटली. प्रभू येशूवर आणि त्याच्या सामर्थ्यशाली कृपेवर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला.  ते आंधळे प्रभू येशूला पूर्णपणे शरण गेले, म्हणूनच 'त्याने त्यांच्या डोळ्यांस स्पर्श करुन म्हटले, तुमच्याविश्वासाप्रमाणे तुम्हांस प्राप्त होवो.' 
प्रभू येशू आपल्या सर्वांच्या जीवनातील अंधकार व आंधळेपणा दूर करुन सार्वकालिक प्रकाश देण्यासाठी पुन्हा येणार आहे. त्याला स्वीकारण्यास आपण पात्र बनवेन म्हणून दयेची याचना करु या. आपल्या अंधकारमय पापी जीवनाबद्दल पश्चात्ताप करुन प्रभुला शरण जाऊ या. आपल्या जीवनातील  सर्व समस्या, संकटे, आजार व दुःखे प्रभू चरणी समर्पित करु या. कळकळीने प्रभुला सांगू या, हे प्रभू, आम्हावर दया कर.


यशया  : यशया २९:१७-२४
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"त्या दिवशी आंधळ्यांना दृष्टी मिळेल."

प्रभू परमेश्वर म्हणतो : “लबानोनची बाग होण्यास, बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे, त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील आणि आंधळ्याचे डोळे काळोखापासून मुक्त होऊन पाहतील. नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल. लोकांतील दीनजण इस्राएलच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील. कारण जुलूम करणारे नाहीसे झाले आहेत. हेटाळणी करणारे संपले आहेत. वाइटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत. ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्टवक्त्यांसाठी जाळे पसरतात आणि धार्मिकांना धडधडीत लबाडीने उलथून पाडतात.”
म्हणून आब्राहामचा उद्धारकर्ता परमेश्वर, याकोबच्या घराण्या विषयी म्हणतो “यापुढे याकोब लज्जास्पद ठरणार नाही आणि त्याचा चेहरा फिका पडणार नाही. कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील तेव्हा ते माझे नाव पवित्र मानतील, याकोबच्या पवित्र प्रभूला पवित्र मानतील आणि इस्राएलच्या देवाचे भय बाळगतील. भ्रांतबुद्धी जनांना समज येईल आणि कुरकुर करणारे बोध घेतील.”
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Isaiah 29: 17-24
Is it not yet a very little while, and Libanus shall be turned into charmel, and charmel shall be esteemed as a forest? And in that day the deaf shall hear the words of the book, and out of darkness and obscurity the eyes of the blind shall see. And the meek shall increase their joy in the Lord, and the poor men shall rejoice in the Holy One of Israel. For he that did prevail hath failed, the scorner is consumed, and they are all cut off that watched for iniquity: That made men sin by word, and supplanted him that reproved them in the gate, and declined in vain from the just. Therefore thus saith the Lord to the house of Jacob, he that redeemed Abraham: Jacob shall not now be confounded, neither shall his countenance now be ashamed: But when he shall see his children, the work of my hands in the midst of him sanctifying my name, and they shall sanctify the Holy One of Jacob, and shall glorify the God of Israel: And they that erred in spirit, shall know understanding, and they that murmured, shall learn the law.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :२७:१-४, १३-१४
प्रतिसाद :   प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे.
१ ) प्रभू माझा दीप आणि उद्धारक आहे 
मी कोणाला भिऊ ? 
प्रभू माझ्या जिवाची संरक्षक तटबंदी आहे. 
मला कुणाची भीती ?

२ ) मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली 
आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन. 
ती म्हणजे साऱ्या आयुष्यभर मी प्रभुसदनी रहावे. 
प्रभूचे सुंदर ध्यान पहात रहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे. 

३) माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल,
अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर. 
हिंमत बाळग, धीर धर. प्रभूचीच प्रतीक्षा कर.


Psalms 27: 1, 4, 13-14
R. (1a) The Lord is my light and my salvation.

1 The psalm of David before he was anointed. 
The Lord is my light and my salvation, whom shall I fear? 
The Lord is the protector of my life: 
of whom shall I be afraid?
R. The Lord is my light and my salvation.

4 One thing I have asked of the Lord, 
this will I seek after; that I may dwell 
in the house of the Lord all the days of my life. 
That I may see the delight of the Lord, and may visit his temple.
R. The Lord is my light and my salvation.

13 I believe to see the good things of the Lord 
in the land of the living.
14 Expect the Lord, do manfully, 
and let thy heart take courage, and wait thou for the Lord.
R. The Lord is my light and my salvation.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
हे आकाशा, वरून वृष्टी कर. आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो, पृथ्वी उकलो. तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित होवोत.
 आलेलुया!

Acclamation: 
Behold, our Lord shall come with power; he will enlighten the eyes of his servants.


शुभवर्तमान मत्तय  : २७-३१
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 येशूवर श्रद्धा ठेवल्याने दोन आंधळे बरे होतात.
येशू त्याच्या गावातून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे येऊ लागले ते मोठमोठ्याने ओरडू लागले. “अहो, दावीदपुत्र आमच्यावर दया करा."
येशू घरात गेला तेव्हा ते आंधळे त्याच्याकडे आले. येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला हवे ते मी करू शकतो अशी तुमची श्रद्धा आहे काय ?"
“होय प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि तो म्हणाला, “तुमच्या श्रद्धेप्रमाणेच तुमच्या बाबतीत घडून येवो. "
त्याबरोबर त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “हे कोणाला कळू नये म्हणू खबरदारी घ्या."
पण ते तेथून निघाले आणि त्या साऱ्या प्रदेशात येशूविषयी सांगत सुटले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 9: 27-31
And as Jesus passed from thence, there followed him two blind men crying out and saying, Have mercy on us, O Son of David.
And when he was come to the house, the blind men came to him. And Jesus saith to them, Do you believe, that I can do this unto you? They say to him, Yea, Lord.Then he touched their eyes, saying, According to your faith, be it done unto you. And their eyes were opened, and Jesus strictly charged them, saying, See that no man know this. But they going out, spread his fame abroad in all that country.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:
 आजचे शुभवर्तमानातील दृश्य हे असामान्य, अगदी रहस्यमय आणि जवळजवळ मजेदार आहे. दोन आंधळे ख्रिस्ताच्या मागे धावत येत असल्याची कल्पना करा. आणि येश त्यांना येऊ देतो! नक्कीच ते वाटेत पडले, फसले आणि स्वतः जखमी झाले. निःसंशयपणे ते थोडे घाबरले असतील किंवा उदास झाले असतील पण त्यांची बरे होण्याची इच्छा आणि त्यांचा ख्रिस्तावरील विश्वास कोणत्याही शारीरिक, भावनिक किंवा मानसिक अडथळ्यांपेक्षा मोठा होता. येशू जेव्हा एखाद्या घरात प्रवेश करील तेव्हाच ते येशूला गाठू शकतात आणि त्यांच्या प्रार्थना, विनंतीला प्रतिसाद मिळवू शकतात. हे खूपच विचित्र आहे कारण सामान्यतः येशू लोकांना बरे करण्यास उत्सुक असतो आणि या शुभवर्तमानाच्या दृश्यात, या दोन आंधळ्यांना येशुकडे त्यांची विनंती मान्य करण्यासाठी का कठीण करतो? कदाचित हे कारणअसावे; देव कधीकधी आपल्या स्वतःच्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास विलंब करतो. या अर्थाने, की, आपल्या इच्छा उथळ असतात आणि देव त्यांना अधिक वेळ देतो. तथापि, अशी काही वेळ आहे जेव्हा देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर देऊ इच्छितो, परंतु आपल्या स्वतःच्या कृती आणि वृत्तीमुळे तो अडथळा आणतो, कारण तो केवळ त्याच्या स्वतःच्या पवित्र स्वभावाच्या आणि प्रेमळ शहाणपणाशी सुसंगतपणे कार्य करतो.

प्रार्थनाहे प्रभू येशू, आमच्यातील अश्रद्धेचा व पापाचा अंधकार दूर कर. तुझ्या तारणदायी प्रकाशात येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या