Marathi Bible Reading | 4th Week of Easter | Monday 27th April 2026

पुनरुत्थान चौथा आठवडा 

सोमवार  दि. २७ एप्रिल २०२६

"मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो.  I am the good shepherd. The good shepherd giveth his life for his sheep. 

संत झिटा

श्रद्धावान आणि भक्तिमान कुटुंबात जन्माला आलेली झिटा ही मुलगी देवाच्या नजरेतून अत्यंत पवित्र आणि विश्वासू असे जीवन जगत असे. तिचे आईवडील ख्रिस्ती जीवन काटेकोरपणे जगत होते व तिची एक बहीण सिस्टर्शियन संघात धर्मभगिनी होती. तिचे काका एक मठवासी होते आणि जिवंतपणीच त्यांना संत मानले जात होते. वयाच्या १२ व्या वर्षी झिटा इटलीतील लुक्का येथल्या एका कुटुंबात स्वयंपाकीण म्हणून काम करू लागली. मरेपर्यत ती त्याच कुटुंबाची सेवाचाकरी करीत होती.
ती अतिशय कर्तव्यदक्षतेने व निष्ठेने काम करी. रात्री-अपरात्री ती प्रार्थना करण्यासाठी उठे. पवित्र मिस्सामध्ये सहभाग घेणे. वारंवार उपवास करणे, आपला जेवणातील काही भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवणे अशी दयाकृत्ये तिने पूर्णतः आत्मसात करून घेतली होती.एकदा एक भिकारी थंडीने कुडकुडत होता. तिने आपले अंथरूण पांघरूण त्याला देऊन टाकले आणि ती जमिनीवर झोपू लागली. तिच्या अशा ह्या वागण्यामुळे तिचे सहकारी नोकर तिचा उपहास करीत. सर्वजणी तिला टोचून बोलत आणि उघडउघड तिचा अपमान करीत असत.
नम्रता, सौम्यता, सहनशीलता आणि देवावरील विशुद्ध प्रेम इत्यादी गुणांमुळे ती ह्या पडझडीच्या काळात टिकून राहिली. इतकेच नव्हे तर साधेपणाने व नम्रतेने तिने आपल्या शत्रूंच्या कारवायांवर मात केली व अनेकांची मर्जी संपादन केली. तिच्या घरमालकांना देखील तिचा चांगुलपणा दिसून आला. त्यामुळे झिटा म्हणजे आपल्या घराची शान आहे, आपल्या कुटुंबातील मौल्यवान देणगी आहे ह्याविषयी त्याची खात्री पटली. आपल्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी तिच्यावर सोपविली. इतकेच काय तिला संपूर्ण घराच्या व्यवस्थापनाचे कामही दिले.
आता झिटाच्या कामाची व्याप्ती वाढली. परंतु त्यातही वेळात वेळ काढून ती गरीब व आजारी लोकांना भेटी देत असे. गोरगरिबांविषयी तिच्या मनात असलेल्या तळमळीमुळे देवाने देखील गोरगरिबांत तिला दर्शन देणे सुरू ठेवले.
नाताळची संध्याकाळ होती. संपूर्ण कुटुंब रात्रीच्या मिस्साला जाण्यासाठी तयारी करीत होते. थंडीत तर हातपाय गारठत होते. त्यामुळे घरमालकाने स्वत:चा एक कोट झिटा हिच्या खांद्यावर टाकीत तिला म्हटले, "आजची रात्र तू हा कोट वापर.” आनंदाने तिने तो फरचा कोट परिधान केला. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी जेव्हा ती पोहोचली तेव्हा अंगावर लक्तरे पांघरलेला एक भिकारी तिच्या नजरेस पडला. त्या भिकाऱ्याने झिटाकडे कोट देण्याची विनंती केली. झिटाने इकडे तिकडे पाहिले व कोट त्या भिकाऱ्याला देत म्हटले, “मी देवळात मिस्साला जात आहे. परंतु येईपर्यंत तू हा कोट पांघर. ह्यानंतर परत जाताना मला हा कोट परत दे. हा कोट माझ्या मालकाचा आहे.” त्या भिकाऱ्याने तो कोट घेतला. मिस्सा आटोपल्यानंतर झिटा त्या माणसाला शोधू लागली. परंतु तो माणूस बेपत्ता झाला होता.
झिटा आता चिंताग्रस्त झाली. आपल्या मालकाला तोंड कसे द्यायचे असा विचार करीत उदास मनाने ती घरात शिरली. तिच्या अंगावर कोट नाही हे पाहून तिचा मालक तिच्यावर तुटून पडला. ख्रिस्मसचा आनंद एकमेकांना देण्याऐवजी शिव्याशापांची आग त्या घरात ओकली जाऊ लागली. थोडक्याच वेळात सर्वजण केक कापण्यासाठी मेजाभोवती जमा झाले तेव्हा दारावरची बेल वाजू लागली. दरवाजा उघडून पाहताच एक अपरिचित व्यक्ती हातात तो फरचा कोट घेऊन उभी होती. त्याने तो कोट झिटाच्या हाती दिला. घरमालक त्या माणसाला काही विचारणार इतक्यात तो अदृश्य झाला परंतु घडलेल्या घटनेमुळे कुटुंबातील वातावरण एकदम बदलून गेले. त्या कुटुंबात आता नाचगाणे सुरू झाले. त्या दिवसापासून ज्या चर्चच्या प्रवेशद्वारापाशी झिटाला तो भिकारी भेटला होता त्या दाराला "देवदूताचे दार" असे नाव पडले.
आपली साधीसुधी कामे अगदी टापटीपपणे व व्यवस्थितरित्या पार पाडणे हा झिटाचा गुणविशेष होता. त्यामुळे देवळात व आसपासच्या परिसरात ती लवकरच नावारुपाला आली. २७ एप्रिल १२७८ रोजी ती मरण पावली. ज्या चर्चमध्ये ती नित्य नेमाने मिस्साला जाई त्या संत फर्डियानो चर्चमध्ये तिला पुरण्यात आले. ती घरकामगारांची आश्रयदाती संतीण मानली जाते.

“मोलकरीण जर उद्योगी नसेल तर ती काय कामाची? कामाविना पावित्र्य हे केवळ ढोंग आणि पोकळ डामडौल आहे." - संत झिटा

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ११:१-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
प्रेषितांनी आणि यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे ग्रहण केले. मग पेत्र येरुशलेमला गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की, सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही का जेवलात ? तेव्हा पेत्रने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली, "मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो. तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टान्त पाहिला की, एक पात्र उतरले आणि ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव आणि आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली आणि मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, "पेत्र, ऊठ, मारून खा, " परंतु मी म्हणालो, "नको, प्रभू ! कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, "देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको." असे तीनदा झाले. नंतर ते अवघे सारे पुन्हा आकाशात वर ओढले गेले. इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरियातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहीली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की, काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा. मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हांला सांगितले की, "मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला." तो म्हणाला, "यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनाला बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे आणि तुझ्या सर्व कुटुंबांचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल." मी बोलू लागलो तो, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली, ती अशी की, योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांला तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले, तर मग देवाला अडवणारा असा मी कोण ?" हे ऐकून ते गप्प राहिले आणि देवाचा गौरव करीत बोलले, "तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 11:1-18
In those days: The apostles and the brothers who were throughout luase heard that the Gentiles also had received the word of God. So when Peter went up to Jerusalem, the circumcision party criticized him, saying, "You went to uncircumcised men and ate with them." But Peter began and explained it to them in order: "I was in the city of Joppa praying, and in a trance 1 sne a vision, something like a great sheet descending, being let down from heaven by its four corners, and it came down to me. Looking at it closely, I observed animals and beasts of prey and reptiles and birds of the air. And I heard a voice saying to me, 'Rise, Peter, kill and eat. But I said, "By no means, Lord; for nothing common or unclean has ever entered my mouth. But the voice answered a second time from heaven, What God has made clean, do not call common. This happened three times, and all was drawn up again into heaven, And behold, at that very moment three men arrived at the house in which we were, seng to me from Caesarea. And the Spirit told me to go with them, making no distinction. These six brothers also accompanied me, and we entered the man's house. And he told us how he had seen the angel stand in his house and say, 'Send to Joppa and bring Simon who is called Peter, he will declare to you a message by which you will be saved, you and all your household. As I began to speak, the Holy Spirit fell on them just as on us at the beginning And I remembered the word of the Lord, how he said, 'John baptised with water, but you will be baptised with the Holy Spirit." If then God gave the same gift to them as he gave to us when we believed in the Lord Jesus Christ, who was I that I could stand in God's way?" When they heard these things they fell silent. And they glorified God, saying, "Then to the Gentiles also God has granted repentance that leads to life."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४२:२,३,४३:३-४
प्रतिसाद :  माझा जीव देवाकरिता तान्हेला आहे.

१) पाण्याच्या प्रवाहासाठी एखादी हरिणी धापा टाकते 
तसाच माझा जीव हे देवा, तुझ्यासाठी धापा टाकीत आहे.

२) माझा जीव देवाकरिता, 
जिवंत देवाकरिता तान्हेला झाला आहे. 

३) तुझे तेज, तुझे सत्य प्रकट कर. 
ते मला मार्गदर्शन करोत.
तुझ्या पवित्र डोंगरावर, 
तुझ्या निवासस्थानी घेऊन जावोत.

४) मग मी देवाच्या वेदीजवळ देव 
जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन 
माझ्या उद्धारका, हे देवा, माझ्या देवा,
वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.


Psalm 42:2-3; 43:3, 4
My soul is thirsting for you, the living God. 

Like the deer that yearns for running streams, 
so my soul is yearning for you my God. 
My soul is thirsting for God, the living God; 
when can I enter and appear before the face of God? R 

O send forth your light and your truth; 
they will guide me on. 
They will bring me to your holy mountain, 
to the place where you dwell. R 

And I will come to the altar of God, 
to God, my joy and gladness. 
To you will I give thanks on the harp, 
O God, my God. R

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
हे येशूखिस्ता, तू विश्वसनीय साक्षी व मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आहेस. तू आम्हांवर प्रीती करतोस आणि आपल्या रक्ताने आम्हांला पापांपासून मुक्त करतोस. 
आलेलुया !

Acclamation: 
I am the good shepherd, says the Lord; I know my own and my own know me.

शुभवर्तमान  योहान १०:११-१८
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो."

येशू म्हणाला, "मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तो मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे, आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तोही मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
: John 10: 11-18
 I am the good shepherd. The good shepherd giveth his life for his sheep. But the hireling, and he that is not the shepherd, whose own the sheep are not, seeth the wolf coming, and leaveth the sheep, and flieth: and the wolf catcheth, and scattereth the sheep: And the hireling flieth, because he is a hireling: and he hath no care for the sheep. I am the good shepherd; and I know mine, and mine know me. As the Father knoweth me, and I know the Father: and I lay down my life for my sheep. And other sheep I have, that are not of this fold: them also I must bring, and they shall hear my voice, and there shall be one fold and one shepherd. Therefore doth the Father love me: because I lay down my life, that I may take it again. No man taketh it away from me: but I lay it down of myself, and I have power to lay it down: and I have power to take it up again. This commandment have I received of my Father.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनअमर्याद प्रेमः शुभवर्तमानात, येशू स्वतःला चांगला मेंढपाळ घोषित करतो, तो त्याच्या मेंढरांसाठी आपले जीवन देण्यास तयार आहे. तो त्याची पार्श्वभूमी किंवा ओळख काहीही असो, सर्वांना त्याचे प्रेम देतो आणि काळजी वाहतो. येशूचे अनुयायी म्हणून, आपण अशी अंतःकरणे असण्याचा प्रयत्न करू या जी विस्तृत, सर्वसमावेशक आणि प्रेमाने भरलेली असतील. आपले हृदय जितके मोठे असेल तितकेच आपल्याला इतरांसाठी जागा मिळेल. आपण वेगळेपणाच्या भिंती तोडून टाकूया आणि समजूतदारपणाचे पूल बांधू या. आपण कोणत्याही अटीशिवाय प्रेम करू या, कोणत्याही आरक्षणाशिवाय स्वीकारू या आणि कोणत्याही अपवादाशिवाय स्वागत करू या.

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तूच आमचे तारणप्राप्तिचे दार आहेस. तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या