Marathi Bible Reading | 4th Week of Easter | Tuesday 28th April 2026

पुनरुत्थान चौथा आठवडा 

मंगळवार  दि. २८ एप्रिल २०२६

 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. My sheep hear my voice, and I know them, and they follow me.

✝️
संत लुईस मॉन्टफोर्ट 

- वर्तनसाक्षी (१६७३-१७१६)

फ्रान्समधल्या ब्रिटानी येथे जन्मलेल्या लुईस मॉन्टफोर्ट ह्याने फ्रान्सच्या ईशान्येकडील भागात ख्रिस्ताचे प्रेषितकार्य पसरविण्याची कामगिरी पार पाडली. तो स्वतः खूप दारिद्र्यात जीवन जगत असे. मात्र पवित्र मरिया आणि पवित्र जपमाळ ह्या विषयावरील साध्या सोप्या भाषेतील त्यांची प्रवचने लोकांना खूप खूप आवडत.
संध्याकाळची वेळ झाली की ते आपल्या हातात बायबल आणि पवित्र जपमाळ घेऊन धावत जात. रोझरीच्या पंधरा रहस्यांपैकी एखादे रहस्य लोकांना समजावून सांगत. त्या रहस्यावर आधारित पवित्र शास्त्रवाचन करीत. नंतर “आमच्या יי स्वर्गीय बापा” व “नमो कृपापूर्ण ” ह्या प्रार्थना म्हणत. अशा प्रकारे पंधरा दिवस एकाच गावात जाऊन प्रभूच्या जन्म, दुःखसहन, मरण पुनरुत्थान आणि गौरव इत्यादीवर प्रबोधन करीत. 'चिंतन न करता केवळ ओठाने पुटपुटलेली रोझरीची प्रार्थना ही आत्मा नसलेल्या देहासारखी कशी अचेतन असते' ते त्यांनी आपल्या प्रवचनांमधून लोकांना समजावून सांगितले. त्यांच्या ह्या उपदेशामुळे जॅन्सनिसम ह्या पाखंड- वादापासून बरेच लोक दूर राहिले आणि ते अधिक प्रभावी व श्रद्धावान ख्रिस्ती जीवन जगू लागले.
त्यांनी दिलेले मिशन व तपसाधना समाप्त करताना अनेक पश्चात्तापी पापी देवाला शरण येत. मग लुईस त्यांना पवित्र देवमाता मरियेच्या संरक्षणाखाली सोपवित असे. अनेक वेळा तिथे रोझरी संघ उदयास आले.
    उपदेशाव्यतिरिक्त लुईस ह्याने बरेच धार्मिक व आध्यात्मिक लेखनही केले. “धन्य कुमारी मरियेची सार्थ भक्ती” या विषयावर त्यांनी केलेले लिखाण आजही आपल्यामध्ये उपलब्ध आहे व ते मरियाभक्तांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. सिस्टर्स ऑफ डिव्हाईन विज्डम आणि कंपनी ऑफ मेरी किंवा मॉन्टफोर्ट फादर्स ह्या संस्था त्यांनीच स्थापन केल्या.

चिंतन : संतांची जडणघडण आणि प्रशिक्षण करण्याचे कार्य परमेश्वराने पवित्र मरियेवर सोपविलेले आहे. • संत लुईस मॉन्टफोर्ट

पहिले वाचन  प्रेषितांचे कृत्ये ११:१९-२६
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“ते प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू

लागले. " स्तेफानवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके, क्रुप्र आणि अंत्युखिया येथपर्यंत फिरून मात्र यहुद्यांना देवाचे वचन सांगत असत. तरी त्यांच्यापैकी कित्येक कुप्री आणि कुरेनेकर होते, ते अंत्युखियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांनाही सांगू लागले. तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले. त्यांच्याविषयीचे वर्तमान येरुशलेममधल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियापर्यंत पाठवले. तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, दृढनिश्चयाने प्रभूला बिलगून राहा. कारण तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर तो शौलचा शोध करावयाला तार्सस येथे गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. मग त्यांनी तेथे वर्षभर मंडळींमध्ये मिळूनमिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 11:19-26

In those days: Those who were scattered because of the persecution that arose over Stephen travelled as far as Phoenicia and the word to no one there were some of them, men of Cyprus and Cyrene, who on coming to Antioch spoke to the Hellenists also, preaching the Lord Jesed the Lord of the Lord was spok them, and a great number who believed turned to the Lord. The report of this came to the ears of the church in Jerusalem, and they sent Barnabas to Antioch. When he came and saw the grace of God, he was glad, and he exhorted them all to remain faithful the Lord with steadfast purpose, for he was a good man, full of the Holy Spirit and of faith. And a great many people were added to the Lord. So Barnabas went to Tarsus to look for Saul, and when he had found him, he brought him to Antioch. For a whole year they met with the church and taught a great many people. And in Antioch the disciples were first called Christians.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ८७:१-७
प्रतिसाद :   अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा!

१ पवित्र डोंगरावर प्रभूचे नगर उभारलेले आहे. 
याकोबच्या कुठल्याही नगरापेक्षा
 वेशीच्या आतले सियोन त्याला अधिक प्रिय आहे.
 देवाच्या नगरा, तुझ्या भावी ऐश्वर्याच्या गोष्टी 
सांगण्यात येत आहेत!

२ "माझ्या अंकितांमध्ये मी इजिप्त आणि 
बाबिलोन यांचा समावेश करीन. फिलिस्ती,
 टायर आणि इथिओपिया यांची 
जन्मभूमी हीच मानतील." 
सियोनविषयी म्हणतील की, 
हे लोक काय आणि ते काय ?
 साऱ्यांचा जन्म येथलाच!

३ परमपरात्पर देव स्वतः ते नगर उभारील. 
लोकांची नावनिशी करताना प्रभू लिहील : 
"अमुक इथे जन्मला होता, " गाणारे 
आणि नृत्य करणारे म्हणतील : 
"तूच आमचे सुखनिधान!"


Psalm 87:1-3, 4-5, 6-7 ( 117:1a)
O praise the Lord, all you nations. 

Founded by him on the holy mountain, 
the Lord loves the gates of Sion, 
more than all the dwellings of Jacob. 
Of you are told glorious things, 
you, O city of God! R 

"Rahab and Babylon I will count 
among those who know me; 
of Tyre, Philistia, Ethiopia, it is told,
There was this one born."

But of Sion it shall be said, 
'Each one was born in her."
" He, the Most High, established it. 

In his register of peoples the Lord writes,
 "Here was this one born."
The singers cry out in chorus,
"In you, all find their home." R

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे आणि आम्हांला प्रकाशित केले आहे. त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले आहे.
आलेलुया !

Acclamation: 
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.

शुभवर्तमान  योहान १०:२२-३०
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “मी आणि पिता एक आहो."
येरुशलेममध्ये मंदिर समर्पणाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शलमोनच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहुद्यांनी त्याला गराडा घालून विचारले, "तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार ? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हांला उघड सांगा." येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 10:22-30
At that time: The Feast of Dedication took place at Jerusalem. It was winter, and Jesus was walking in the temple, in the colonnade of Solomon. So the Jews gathered around him and said to him, "How long will you keep us in suspense? If you are the Christ, tell us plainly." Jesus answered them, "I told you, and you do not believe. The works that I do in my Father's name bear witness about me, but you do not believe because you are not among my sheep. My sheep hear my voice, and I know them, and they follow me. I give them eternal life, and they will never perish, and no one will snatch them out of my hand. My Father, who has given them to me, is greater than all, and no one is able to snatch them out of the Father's hand. I and the Father are one."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनप्रेषितांची कृत्ये मध्ये, आपण बर्णबाला भेटतो, पवित्र आत्म्याने भरलेला एक चांगला माणूस, जो अँटिओकमधील नवीन समुदायाला प्रोत्साहन देतो. शुभवर्तमानात, येशू घोषित करतो की तो आणि पिता एक आहेत आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना शाश्वत जीवन मिळेल. बर्णबासारखे व्हा, प्रोत्साहनाचा एक साधा शब्द थकलेल्या आत्म्यासाठी एक शक्तिशाली उपाय असू शकतो! मधाच्या थेंबाप्रमाणे, ते आत्म्याला गोड करतात, चेतावणी, सांत्वन आणि आशा आणतात. आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना उदारतेने प्रोत्साहनाचे हे मौल्यवान थेंब दिले पाहिजेत. हृदयांना पुनरुज्जीवित करतात आणि स्वप्नांना पुनरुज्जीवित करतात. एक सौम्य वाक्यांश, ऐकणारा कान किंवा आश्वासक हास्य परिवर्तनासाठी प्रेरक असेल. तर, चला प्रोत्साहन पसरवूया, जीवन कसे उजळते, आत्मे नूतनीकरण होतात आणि आशा पुन्हा जागृत होते ते पहा.

प्रार्थना :-
  हे प्रभू येशू ख्रिस्ता, तूच माझा मेंढपाळ आहेस, मला सन्मार्गावर चालण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या