सामान्यकाळातील दहावा सप्ताह
सोमवार दि. ८ जुन २०२६
"जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील."
“Blessed are the pure in heart, for they shall see God.
संत मरियम तेरसिया
• वर्तनसाक्षी
खिस्तसभा आज संत मरियम तेरसिया हीचा स्मृतीदिन साजरा करीत आहे. बालपणापासूनच तेरसीयाला देवाच्या प्रेमाची गोडी लागली व तिने स्वत:ला प्रार्थनामध्ये समर्पित केले. गरीब, आजारी आणि गरजवंतांच्या सेवेसाठी तिने स्वत:चे जीवन ख्रिस्तचरणी समर्पित केले आहे. बिशपांच्या विनंती करुन तिने फ्रान्सिस्कन क्लॅरेटस् संस्थेची स्थापना केली. तिच्या प्रार्थनेद्वारे संत तेरसीयाने आध्यात्म्याची उच्च पातळी गाठली होती. संत मरियम तेरेसीयाचा आदर्श समोर ठेवून आपण सेवाकार्य करण्यास प्रेरणा घेऊ या.
पहिले वाचन :१ राजांच्या १७:१-६
वाचक : राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन १७:१-६
"एलिया इस्राएलच्या देवाचा सेवक आहे."
एलिया तिश्बी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबाला म्हणाला, "इस्राएलचा देव परमेश्वर ज्याचा सेवक मी आहे त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दंहिवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल." पुढे परमेश्वराचे वचन त्यांला प्राप्त झाले "येथून निघून पूर्व दिशेला जा आणि यार्दैनसमोरच्या करिंथ ओहळानजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील." परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो यार्दैनसमोरच्या करिंथ ओहळानजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी आणि मांस सकाळ संध्याकाळ आणून देत आणि त्या ओहळाचे पाणी तो पिई.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :1 Kgs 17: 1-6
Now Eli´jah the Tishbite, of Tishber in Gilead, said to Ahab, “As the Lord the God of Israel lives, before whom I stand, there shall be neither dew nor rain these years, except by my word.” And the word of the Lord came to him, “Depart from here and turn eastward, and hide yourself by the brook Cherith, that is east of the Jordan. You shall drink from the brook, and I have commanded the ravens to feed you there.” So he went and did according to the word of the Lord; he went and dwelt by the brook Cherith that is east of the Jordan. And the ravens brought him bread and meat in the morning, and bread and meat in the evening; and he drank from the brook.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२१:१-२,३-४,५-६,७-८
प्रतिसाद : आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य मिळते.
१ मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो;
मला सहाय्य कोठून मिळेल ?
आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता
जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य मिळते.
२ तो माझा पाय कदापि ढळू देत नाही !
तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पाहा,
इस्राएलच्या रक्षकाला झोप लागत नाही
आणि तो डुलकीही घेत नाही.
३ परमेश्वर तुझा रक्षक आहे,
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.
दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही
४ परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील,
तो तुझ्या जिवाचे रक्षण करील,
परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.
Psalm 121: 1bc-2, 3-4, 5-6, 7-8 R. (2) Our help is from the Lord, who made heaven and earth.
1bc I have lifted up my eyes to the mountains, from whence help shall come to me.
2 My help is from the Lord, who made heaven and earth.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.
3 May he not suffer thy foot to be moved: neither let him slumber that keepeth thee.
4 Behold he shall neither slumber nor sleep, that keepeth Israel.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.
5 The Lord is thy keeper, the Lord is thy protection upon thy right hand.
6 The sun shall not burn thee by day: nor the moon by night.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.
7 The Lord keepeth thee from all evil: may the Lord keep thy soul.
8 May the Lord keep thy going in and thy going out; from henceforth now and for ever.
R. Our help is from the Lord, who made heaven and earth.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Rejoice and be glad; for your reward will be great in heaven.
R. Alleluia, alleluia.