Marathi Bible Reading | 15th week in ordinary Time | Monday 13th July 2026 |

 सामान्यकाळातील पंधरावा सप्ताह 

सोमवार १३  जुलै  २०२६ 

“जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो 
 "Whoever receives you receives me, and whoever receives me receives him who sent me. 


संत हेन्री दुसरा

सम्राट, वर्तनसाक्षी (९७३-१०२४)

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू त्याच्या सामर्थ्याशाली जीवनावर  चिंतन करुन स्वीकार करण्यास आवाहन करीत आहे. आपण सर्वांनी ख्रिस्ती हे नाव धारण केले आहे. ख्रिस्ती म्हणजेच ख्रिस्ताचे अनुयायी. ख्रिस्ती म्हणजेच  ख्रिस्तानुकरण करणारे. ख्रिस्ती म्हणजेच जीवनातील वधस्तंभ उचलून जीवन जगणारे. ख्रिस्ती म्हणजेच देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन समर्पित जीवन जगणारे, देवाच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन जगणारे असे ख्रिस्ती जीवन  प्रभू येशूला अपेक्षित आहे.  आपल्या जीवनातील सर्व संकटे, दु:खे, वेदना, आजार, अपयश, निराशा ह्यांचे क्रुस उचलून घेऊन ख्रिस्ताबरोबर चालू या. प्रभू येशू जीवनाच्या अंतिम क्षणी| आपल्या प्रत्येकाला सार्वकालिक सुखात नेणारा आहे.

पहिले वाचन :यशया १:१०-१७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"तुम्ही स्वतःला निर्मळ करा, माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा."

सदोमच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका, परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे ? मेंढरांचे होम, पुष्ट वासंराची वपा यांनी माझी अति तृप्ती झाली आहे; बैल कोकरे आणि बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही."
तुम्ही माझे दर्शन घ्यायला येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका; धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बाथ आणि मेळे भरवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने आणि सण याचा द्वेष करतो; त्याचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, तुमचे हात रक्ताने भरले आहेत. आपणांला धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दृष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या; चांगले करायला शिका, नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा; अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Isaiah 1:10-17

Hear the word of the Lord, you rulers of Sodom! Give ear to the teaching of our God, you people of Gomorrah! "What to me is the multitude of your sacrifices? says the Lord; I have had enough of burnt offerings of rams and the fat of well-fed beasts; I do not delight in the blood of bulls, or of lambs, or of goats. "When you come to appear before me, who has required of you this trampling of my courts? Bring no more vain offerings; incense is an abomination to me. New moon and Sabbath and the calling of convocations - I cannot endure iniquity and solemn assembly. Your new moons and your appointed feasts my soul hates; they have become a burden to me; I am weary of bearing them. When you spread out your hands, I will hide my eyes from you; even though you make many prayers, I will not listen; your hands are full of blood. Wash yourselves; make yourselves clean; remove the evil of your deeds from before my eyes; cease to do evil, learn to do good; seek justice, correct oppression; bring justice to the fatherless, plead the widow's cause.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ५०:८-९,१६-१७,२९,२३
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला 
मी तारण प्राप्त करून देईन.

१ )तुझ्या यज्ञांसंबंधाने तर मी तुला बोल लावीत नाही; 
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच 
तुझ्या घरचा गोन्हा किंवा तुझ्या 
मेंढवाड्यातला बोकड मला घ्यावयाचा नाही.

२) दुर्जनाला तर देव म्हणतो: 
माझे नियम जाहीर करणारा तू कोण ? 
माझा करार आपल्या मुखात उच्चारणारा तू कोण ?
 तू तर शिस्तीचा द्वेष करतोस,
माझी वचने मागे झुगारून देतोस.

३ )असे तू केले तरी उगा राहिलो, 
मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले.
 जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो. 
आणि जो सरळ मार्गाने चालतो 
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.


Psalm 50:8-9, 16bc-17, 21 & 23

R. To one whose way is blameless, I will show the salvation of God.

I do not rebuke you for your sacrifices; " 
your offerings are always before me.
I do not take more bullocks from your farms, 
nor goats from among your herds." R

"How can you recite my commandments, 
and take my covenant on your lips, 
you who despise correction,
and cast my words behind you?" R

You do this, and should I keep silence?
Do you think that I am like you?
I accuse you, lay the charge before you. 
A sacrifice of praise gives me honour, 
and to one whose way is blameless, 
I will show the salvation of God." R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळावयास मला शिकव.
 आलेलुया!



Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
Blessed are those who are persecuted for righteousness' sake, for theirs is the kingdom of heaven.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मत्तय १०:३४-११:१
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मी शांतता आणण्यास आलो नाही तर तरवार चालवण्यास आलो आहे." 

येशूने आपल्या प्रेषितांना म्हटले, “मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो आहे असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवायला आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू ह्यांच्यात फूट पाडायला मी आलो आहे आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आणि आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही; ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील.
“जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गा पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचित सांगतो." येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवायला आणि उपदेश करायला गेला.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 10:34-11:1


At that time: Jesus said to his disciples, "Do not think that I have come to bring peace to the earth. I have not come to bring peace, but a sword. For I have come to set a man against his father, and a daughter against her mother, and a daughter-in-law against her mother-in-law. And a person's enemies will be those of his own household. Whoever loves father or mother more than me is not worthy of me, and whoever loves son or daughter more than me is not worthy of me. And whoever does not take his cross and follow me is not worthy of me. Whoever finds his life will lose it, and whoever loses his life for my sake will find it. "Whoever receives you receives me, and whoever receives me receives him who sent me. The one who receives a prophet because he is a prophet will receive a prophet's reward, and the one who receives a righteous person because he is a righteous person will receive a righteous person's reward. And whoever gives one of these little ones even a cup of cold water because he is a disciple, truly, I say to you, he will by no means lose his reward. When Jesus had finished instructing his twelve disciples, he went on from there to teach and preach in their cities.

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन
यशया सांगतो की देवाला केवळ विधी, बलिदान किंवा बाह्य भक्ती नको-त्याला शुद्ध, सत्य आणि न्यायाने भरलेले जीवन हवे आहे. देवाच्या नजरेत खरी उपासना म्हणजे गरजूंना मदत, अत्याचारितांना न्याय आणि मनाची स्वच्छता. देव म्हणतो, “वाईट करणे सोडा, चांगले करायला शिका'- हीच अंतःकरणातील उपासना. पाप धुवून टाकणे फक्त पाण्याने नव्हे, तर जीवनशैली बदलूनच शक्य होते. मत्तयाच्या सुवार्तेत येशू सांगतो की शिष्यत्व म्हणजे सोपे जीवन नव्हे- कधी कधी संघर्ष आणि विभाजनही येऊ शकतात. ख्रिस्तासाठी उभे राहणे म्हणजे कुटुंब, समाज किंवा जगाच्या अपेक्षांपेक्षा देवाच्या अपेक्षांना प्राधान्य देणे. "माझ्यापेक्षा कोणावर प्रेम अधिक असेल तो माझा योग्य शिष्य नाही" याचा अर्थ प्रेम सोडणे नव्हे, तर देवाला केंद्रस्थानी ठेवणे. शिष्यत्वाची किंमत आहे-स्वतःचा क्रूस उचलणे, सत्यात उभे राहणे आणि विश्वासावर ठाम राहणे. पण जो हा मार्ग चालतो त्याला देवाची उपस्थिती, शक्ती आणि आशीर्वाद मिळतो- हाच खरा पुरस्कार. म्हणून ख्रिस्ती जीवन म्हणजे बाह्य विधींनी देवाला खुश करणे नव्हे, तर प्रामाणिक जीवन, न्याय आणि धैर्याने दिलेली साक्ष-ज्यामुळे आपण खरे शिष्य बनतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्वस्व समर्पित करुन तुला स्वीकारण्यास व तुझे अनुकरण करण्यास मला धैर्य व कृपा दे, आमेन.
✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या