पुनरुत्थानकाळ सातवा सप्ताह
शनिवार दि. २३ मे २०२६
तू माझ्या मागे ये."
You follow me!
संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी
- वर्तनसाक्षी (१६९८- १७६४)
रोममधील कॅम्पो वॅक्सीनो येथे जमणाऱ्या धनगरांना आणि शेतकामगारांना भल्या पहाटे आणि रात्री उशीरा प्रवचने देऊन मार्गदर्शन करण्याचे काम जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी मोठ्या आवडीने करीत असे. दिवसा तो जवळच्याच रूग्णालयातील आजाऱ्यांना भेटी देई. रात्री जिकडे तिकडे भटकणाऱ्या बेघरांना राहण्यासाठी त्याने संत गाला हॉस्पीटलजवळ एक घर बांधले होते.
तरुणपणी जॉनला अधूनमधून वाताचे झटके वा फिट्स यायच्या. त्यामुळे त्यांनी कुमसाराच्या प्रेषितकार्यापासून स्वतःला दूर ठेवलेले होते. मात्र त्याचे पावित्र्य पाहून स्थानिक बिशपांनी त्यांना तेही प्रेषितकार्य स्वीकारण्यास प्रेरणा दिली. फा. जॉनच्या कुमसार प्रेषितकार्यामुळे इतक्या झटपट लोकांची जीवने बदलू लागली की त्याच्या कुमसार ऐकण्याच्या अधिकाराची व्याप्ती साऱ्या रोम शहरापर्यंत वाढवून देण्यात आली. अशा प्रकारची परवानगी काही निवडक धर्मगुरूंनाच देण्यात येते.
धनगर, मेंढपाळ, शेतमजूर ह्यांचा सांभाळ करणाऱ्या फा. जॉन ह्यांच्यावर आता ही नवीन जबाबदारी आल्यामुळे ते कैदी, आजारी, गरीब, निरक्षर अशा लोकांची कुमसारे ऐकण्यासाठी हॉस्पीटलमध्ये लोकांच्या घरी आणि तुरूंगात जात असत.
संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी हे २३ मार्च १७६४ रोजी मरण पावले आणि १८८१ साली त्यांना संतपद देण्यात आले.
चिंतन : पारादिसचा अनंतकालीन आनंद अनुभवायचा असेल तर आपण अखंडितपणे अहोरात्र कष्ट करायला हवेत. - संत जॉन बॅप्टिस्ट डी रॉस्सी
त्यागमय जीवन जगणे, देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे, क्रुस व वेदनांना स्वीकारणे, प्रभूची वचने पाळून पवित्र जीवन जगणे आणि आपल्या जीवनाद्वारे देवाची सुवार्ता पसरविणे. येशू ख्रिस्ताच्या मागे चालत असताना आपल्या जीवनात अनेक संकटे, अडचणी व आव्हाने येणारच, मात्र त्यातून निभावून जाण्यासाठी प्रभू येशू आपल्याला धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा देत आहे..
